Breaking
ब्रेकिंग

मनमाड येवला रोड गोरख नगर परिसरात संशयास्पद हालचालींची चर्चा; नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण!

काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओसह संशयास्पद व्यक्तींबाबत सतर्कतेचे आवाहन; व्हायरल ऑडिओ क्लिपचीही चौकशी करण्याची मागणी

1 4 0 1 9 8

येवला दिनांक १८ नोव्हेंबर 

गोरख नगर परिसरात मनमाडच्या दिशेने असलेल्या वनक्षेत्रात अज्ञात वाहनातून ९ ते १० संशयास्पद व्यक्ती शस्त्रांसह उतरल्याचा संदेश सोशल मीडिया व व्हॉट्सॲप ग्रुपवर वेगाने व्हायरल होत आहे.

यासोबतच या प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा केला जात असलेली एक ऑडिओ क्लिपदेखील प्रसारित होत आहे. मात्र, या ऑडिओमधील संभाषण नेमके कोणाचे आहे, संबंधित व्यक्ती कोण आहेत आणि या संभाषणाचा कथित घटनेशी काही संबंध आहे का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

 

या व्हायरल संदेशांमुळे सावखेडे, अनकुटे व परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी या सर्व माहितीची तातडीने सत्यता पडताळून घटनास्थळाची पाहणी करावी, व्हायरल ऑडिओ क्लिपची तपासणी करावी आणि माहितीमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

 

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन!

 

सावखेडे व अनकुटे परिसरात काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी किंवा संशयास्पद व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून सामना करू नये. तातडीने पोलिसांना, गावातील पोलीस पाटील किंवा ग्रामरक्षक दलाला माहिती द्यावी.

अफवांवर विश्वास ठेवू नका; मात्र सतर्कता बाळगा! नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी तातडीने वस्तुस्थिती स्पष्ट करावी.

 

टीप : सदर माहिती सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या संदेशांवर आधारित असून, घटनेची व ऑडिओ क्लिपची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

3.7/5 - (4 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 0 1 9 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे