Breaking
महाराष्ट्र

घोटी जनता विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व स्व. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी

सिन्नर प्रतिनिधी(सोमनाथ गिरी )

1 3 2 7 6 0

न्यायभूमी 

सिन्नर दिनांक ०१ नोव्हेंबर 

 मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित घोटी येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली . 

     कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य कैलास आहेर होते. व्यासपीठावर 

 चारूशीला तागडे,हेमंत झोले,निवृत्ती सरगर,कैलास पाचोरे,अर्पणा उईके,अविनाश निकम,संपत शेंगाळ,गायत्री सूर्यवंशी,प्रकाश तांबे, सत्येन जाधव,मंगेश कासार,प्रा. स्वाती जगताप,मुख्यलिपीक रावसाहेब 

रणशेवरे, वरिष्ठ लिपिक जीवन शिंदे, अनिल गोवर्धने आदी उपस्थित होते.उपस्थितीतांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

      सोमनाथ गिरी व उज्वला देवरे यांनी सरदार वल्लभभाई पटेल व इंदिराजी गांधी यांच्या कार्याची ओळख करून दिली. 

    अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य कैलास आहेर म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल यांना पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाते. संस्थानिकांच्या विलीनीकरणासाठी त्यांनी पुढाकार घेतला.

तसेच भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून तसेच इंदिराजी गांधी यांनी केलेले कार्य अतिशय महान व देशाला एक संघ करण्यासाठी व प्रगतीपथावर नेण्यासाठी महत्त्वाचे आहे . दोन्हीही विभुतींचे महान कार्य आहे.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ गिरी यांनी तर आभार रमेश देवगिरे यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर सेवक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 3 2 7 6 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे