Breaking
आरोग्य व शिक्षण

निफाड येथील बी.पी.पाटील संलग्न वैनतेय विज्ञान महाविद्यालयाचे एच.एस.सी बोर्ड मधील यश 2025 महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

निफाड दि ०७ में उत्तम गारे 

निफाड येथील बी.पी.पाटील संलग्न वैनतेय विज्ञान महाविद्यालयाचे एच.एस.सी बोर्ड मधील यश 2025 महाविद्यालयाचा शेकडा निकाल शंभर टक्के लागलेला असून पूजा शिवाजी कदम या विद्यार्थिनीने 88.33% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला.

तसेच संस्कृती मनोज राठी या विद्यार्थिनीने 88.17% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आणि सिद्धेश दिलीप गायकवाड या विद्यार्थ्याने 86.50% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकविला.

ऋतुजा अनिल जोगदंड 86.33% गुण मिळवून चतुर्थ क्रमांक, अमृता संतोष किटट्ये 86.33% गुण मिळवून चतुर्थ क्रमांक तर अनुष्का अनिल वाघचौरे 85.17 % गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळविला.

विषयानिहाय निकाल पुढीलप्रमाणे संस्कृती मनोज राठी या विद्यार्थिनीने इंग्रजी या विषयात 100 पैकी 87 मार्क्स ,वैष्णवी गणेश आहेर शंभर पैकी 87 मार्क्स मिळविले.

निकिता पोपट सानप शंभर पैकी 90 मार्क्स मराठी विषयात मिळविले ,समृद्धी मनोज राठी 100 पैकी 97 मार्क्स आय.टी या विषयात मिळविले ,ओम कैलास पडोळ शंभर पैकी 96 मार्क्स गणित या विषयात मिळविले, अथर्व शिवाजी नागरे शंभर पैकी 90 मार्क्स फिजिक्स या विषयात मिळवले.

दीक्षा संदीप शिंदे शंभर पैकी 94 मार्क्स केमिस्ट्री या विषयात मिळविले ,सिद्धेश दिलीप गायकवाड 100 पैकी 98 मार्क्स बायोलॉजी या विषयात मिळविले ,पार्थ संतोष कराड 100 पैकी 93 मार्क्स भूगोल या विषयात मिळविले.

तसेच फिजिक्स विषयात 80 व त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे 48 विद्यार्थी केमिस्ट्री या विषयात 80 व त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे 172 विद्यार्थी ,मॅथेमॅटिक्स या विषयात 80 व त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे 202 विद्यार्थी ,बायोलॉजी या विषयात 80 व त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे 170 विद्यार्थी,आयटी विषयात 80 व त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे 18 विद्यार्थी ,जिओग्राफी या विषयात 80 व त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे 38 विद्यार्थी आहेत.114 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.

महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. डॉ.सी.यू.नाईकवाडे सर व प्राध्यापक वृंद तसेच ग्रामस्थांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

5/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे