आरोग्य व शिक्षण
एस.एन.डी.अभियांत्रिकी व संशोधन केंद्र, बाभुळगाव,येवला येथे ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ.शियाली रामामृत रंगनाथन यांच्या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा

1
1
8
3
0
7
न्यायभूमी
येवला दि.१४ ऑगस्ट
एस.एन.डी.अभियांत्रिकी व संशोधन केंद्र, बाभुळगाव,येवला येथे ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ.शियाली रामामृत रंगनाथन यांच्या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी प्राचार्य डॉ.दीपक पाटील यांनी ग्रंथालयाचे महत्त्व तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीतील ग्रंथालयाची भूमिका यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
या प्रसंगी ग्रंथपाल प्रा. नागरे जे.पी.आणि प्रा. दामले ए.डी.यांनी ग्रंथालयातील विविध संदर्भ सेवा तसेच ग्रंथालयाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी विभागप्रमुख डॉ.राणे,डॉ. अन्सारी,प्रा.साठे,डॉ.निकम मॅडम आणि डॉ. बोंबले मॅडम उपस्थित होते.
1
1
8
3
0
7



