Breaking
आरोग्य व शिक्षण

मराठी अभिजात भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ दिंडीचे आयोजन

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

1 2 3 9 9 3

न्यायभूमी 

 लासलगाव दिनांक ०३ ऑक्टोंबर ­प्रतिनिधी कैलास उपाध्ये  


लासलगाव येथील लोकनेते दत्ताजी पाटील माध्य.व उच्च माध्य. विद्यालयात मराठी अभिजात भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहत साजरा करण्यात आला.

याप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या विद्या कुळधरण यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

टाळ मृदुंगाच्या गजरात ग्रंथ दिंडीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध घोषवाक्य तसेच मराठी गाण्यांच्या जय घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला.

संस्थेच्या अध्यक्षा नीताताई पाटील,सचिव संजय पाटील,उपाध्यक्ष निवृत्ती गायकर,खजिनदार अभय पाटील व सर्व संचालक मंडळ यांनी मराठी अभिजात भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी चंद्रकांत नेटारे रमेश पगार,संदिप गंभिरे,प्रमोद पवार,राजेंद्र पाडवी, निलेश खैरे,सुनंदा वंजारी ,विद्या निरगुडे ,त्रिकला मानभाव, अश्विनी आगळे,वैशाली जाधव,निरज पाटील, तेजस्विनी गायकवाड सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वाचे विशेष सहकार्य लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 2 3 9 9 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे