लासलगाव येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
लासलगाव दि.२७ मार्च निशिकांत पानसरे
राम मंदिर ट्रस्ट लासलगाव गुरुवार दिनांक २६/३/२६ रोजी श्रीराम जन्मोत्सव श्रीराम मंदिर लासलगाव येथे मोठ्या उत्साहाने संपन्न झाला या कार्यक्रमासाठी परिसरातील मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.
श्रीराम जन्मोत्सवानिमित्त कीर्तन आयोजित करण्यात आले होते या कीर्तनासाठी परिसरातील भजनी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लासलगावचे पोलीस अध्यक्ष श्री दीपक पाटील यांच्या हस्ते श्रीराम जन्मोत्सवाच्या वेळेस महाआरती करण्यात आली.
या आरतीमध्ये लासलगाव परिसरातील भाविक बंधूभगिनी सहभागी झाले होते या महाआरतीच्या वेळेस प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जय घोषाने संपूर्ण परिसर दुम दमून गेला होता.
यावेळेस संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.उपस्थित भाविक भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले .
श्रीराम जन्मोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्रीराम मंदिर ट्रस्ट लासलगावचे अध्यक्ष श्री अशोक नाना होळकर,डॉक्टर कैलास पाटील डॉक्टर युवराज पाटील,सुरेश वडनेरे, विष्णू निकम,कवीप्रकाश होळकर नानासाहेब पाटील,भरत पाटील,सौरभ पाटील तसेच लासलगाव ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य श्री सी एस पाटील,एस आर शिंदे अरविंद देसाई भरत वडनेरे,शिवाजी होळकर तसेच अग्निहोत्री,जितू गुरव व परिसरातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीराम जन्मोत्सवानिमित्त संध्याकाळी भव्य शोभायात्रा हनुमान चालीसा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

