न्यायभूमी न्यूज
विंचूर (नाशिक) ०१ ऑक्टोंबर : दत्तात्रय दरेकर
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय व प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३८ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तदर्थ जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश मा. रामकृष्ण चव्हाण होते.
कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.यावेळी मा. न्यायाधीश रामकृष्ण चव्हाण, उत्तर विभागीय सल्लागार समिती सदस्य सुनिल मालपाणी, स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष जगदिश जेऊघाले,उपाध्यक्ष कैलास सोनवणे, ज्येष्ठ सदस्य पंढरीनाथ दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे यांनी स्वागत केले तर उपमुख्याध्यापक सुरेश वाबळे यांनी शाळेचा प्रगती अहवाल सादर केला.
मुख्य पाहुणे न्यायाधीश रामकृष्ण चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,
“कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजनांसाठी सुरू केलेल्या शिक्षणयात्रेचा लाभ घेऊन माझ्यासारखे हजारो विद्यार्थी जीवनात यशस्वी झाले आहेत.
रयत शिक्षण संस्थेमार्फत दिले जाणारे शिक्षण हे जागतिक स्पर्धेत टिकून राहणारे सक्षम शिक्षण आहे.यशासाठी शॉर्टकट नसतो. प्रतिकूल परिस्थितीला कारण न बनवता साधन बनवावे.”
अध्यक्षस्थानी असलेले जगदिश जेऊघाले यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.
तसेच पी.के.जेऊघाले,व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजाभाऊ गोरे,रंजीत गुंजाळ यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सोमनाथ निकम,संदीप जोशी,गुरुकुल उपाध्यक्ष दत्तात्रय दरेकर,ज्ञानेश्वर गाडे,किशोर दरेकर,मधुकर दरेकर,सतीश शेलार,कुमार चव्हाण,डिजिटल प्रेस मिडिया तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शाळेतील खेळाडूंना खेळासाठी साहित्य उपलब्ध करून दिले.
विद्यार्थ्यांना सर्व अद्यावत साहित्य व स्पोर्ट ड्रेसेसचे वाटपही करण्यात आले क्लबचे पत्रकार – सुनील शिरसागर,राजेश भडांगे,जनार्दन चव्हाण,मच्छिंद्र साळुंके,अभय पाटील,दत्तात्रय दरेकर,रोहन सरोदे,संदीप धनवटे,मान्यवर, ग्रामस्थ,पालक,शिक्षणप्रेमी तसेच प्राथमिक ते उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र चांदे (लाइफ मेंबर, रयत शिक्षण संस्था सातारा) व सावळे मॅडम यांनी केले.
आभार प्रदर्शन विद्यालयाचे पर्यवेक्षक सुदामराव माळी यांनी केले.


