Breaking
संपादकीय

नैताळे येथील श्री मतोबा महाराज यात्रेला अलोट गर्दी…!लाखो भाविक भक्तांचे नवसाला पावणारे दैवत

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

 नैताळे :- (नाशिक ) दि २३ जानेवारी मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

रयतेचा आवाज चमू :-नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नैताळे येथील ग्रामस्थांचे आराध्य दैवत श्री. मतोबा महाराज हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे दैवत असल्याने श्री.मतोबा महाराज यात्रोत्सवास मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर पासून पौर्णिमेला प्रारंभ झाला.

कोणत्याही प्राण्यास अथवा मनुष्यास कुठेही विंचू ,साप, इंगळी चावली असेल तर श्री. मतोबा महाराज यांच्या नावाने नुसता अंगारा लावला.

तरी त्याचा चावा घेतलेल्या ठिकाणची विषबाधा कमी होते .अशी लाखो भाविकांची श्रद्धा आहे .या श्रद्धेपोटीच हजारो भाविक देवाला नवस करतात.हाच नवस फेडण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक नैताळे येथे येतात .व मनोभावाने दर्शन करून देवाच्या चरणी लीन होतात.

या यात्रोत्सवात सहभागी होणारा प्रत्येक भाविक मैदा, तूप, साखर यापासून बनवलेली जिलेबी प्रसाद म्हणून घेतात. यात्रोत्सवात जीवनावश्यक वस्तूची दुकाने तसेच भाविकांच्या मनोरंजनाचे गगनचुंबी पाळणे ही आले आहे. 

नैताळे येथे जिल्ह्यातील सर्वात मोठी बांबूची बाजारपेठ असल्याने त्याचबरोबर शेती, अवजारे, लाकडी वस्तूंची दुकाने आणि साबुदाण्याची घाऊक विक्री यात्रा काळात होते. श्री.मतोबां महाराजांच्या रथाला बैल जोडी जुंपण्यासाठी परिसरातील शेतकरी बैलांना पोळ्या प्रमाणे सजवतात .तसेच यात्रेत सजवून रथाला जुंपतात.

पारंपारिक कला असलेले कारागीर आपल्या वस्तू आणि साहित्याची विक्री करण्यासाठी राज्यासह परराज्यातून येतात त्याचबरोबर खेळण्या,खाद्यपदार्थ आणि लोखंडी वस्तू खरेदी विक्रीला चालना देणारी ही यात्रा आर्थिक उलाढालीचे मोठे व्यासपीठ आहे.

त्यामुळे नागरिक येथे नवसपूर्ती झाल्यानंतर खरेदीला मोठा प्रतिसाद देतात. मतोबा महाराजांचे मंदिर अत्याधुनिक करण्यात आलेले आहे. देवाची मूर्ती लक्षवेधी आहेच. पण गाभारा आरसी महाल पद्धतीने सजवण्यात आलेला आहे. 

संपूर्ण काचेचं काम केलेलं असल्याने मंदिर आणि गाभारा आरसे महाल पद्धतीने बनवण्यात आलेला आहे. त्यामुळे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना चैतन्यदायी वातावरणाची अनुभूती येते. येथील प्रसाद म्हणून नागरिक खास पद्धतीने बनवलेली जिलेबी खरेदी करतात .त्यामुळे जिलेबी बनवणारे कारागीर जागोजागी ठिय्या मांडून गरमागरम जिलेबी चे घाणे काढताना दिसतात.

बच्चे कंपनीचे आकर्षक असलेले राहट पाळणे ,खेळणी, मौत का कुवा, आणि इतर साहशीखेळ यात्रेचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. पारंपारिक मनोरंजनाची साधन आणि लोककला असलेल्या तमाशा कलावंतांना सलग पंधरा दिवस यात्रेमुळे येथे आपले फड टाकतात..त्यामुळे इतर कोठेही न दिसणारे दुर्मिळ तमाशा मतोबा महाराज यात्रेत आवर्जून पहावायला मिळतात.

यामुळेच शनिवार रविवारी नोकरदाराचा सुट्टी चा वार असल्याने चारही बाजूंनी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

नैताळे यात्रेत अलोट गर्दी दिसून आली. मात्र श्री. मतोबा महाराज देवस्थान ट्रस्ट च्या वतीने दूरवरून येणाऱ्या प्रत्येक भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता येईल.

यात्रेत,लाईट,पाणी आरोग्याच्या दृष्टीने तसेच भुरट्या चोरांपासून आवश्यक सर्व बाबीची काळजी ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच निफाड पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांनी चोख व्यवस्था करण्यात आल्याची माहिती श्री. मतोबा महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव बोरगुडे व सर्व विश्वस्त मंडळातील पदाधिकारी यांनी दिली.

5/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे