Breaking
महाराष्ट्र

श्री क्षेत्र झुंगे बेट येथे भव्य ‘शांतिब्रह्म’ एकनाथ महाराज षष्ठी सोहळ्याचे आयोजन

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 0 0 0 1

न्यायभूमी 

खेडलेझुंगे ०८ मार्च बाबा गिते 

गोदावरीच्या दक्षिण तिरावर वसलेले श्री क्षेत्र झुंगे बेट येथे ऊद्या सोमवार,दिनांक ९ मार्च २०२६ रोजी शांतिब्रह्म एकनाथ महाराज यांच्या षष्ठीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

समस्त ग्रामस्थांच्या वतीने या भव्य सोहळ्याचे नियोजन करण्यात आले असून,परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे 

सोमवारी सायंकाळी ४:०० वाजता श्री क्षेत्र पैठण येथून आलेल्या मनाच्या ध्वजाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवनुकिंनंतर ध्वजारोहणाने सोहळ्याची सुरुवात होईल.

त्यानंतर ४:१५ वाजता पायी दिंडी काढण्यात येणार असून,गोदावरी तीरापर्यंत जाऊन शांतिब्रह्म एकनाथ महाराज यांच्या पादुकांचे दर्शन व गोदावरी आरती संपन्न होईल.

सायंकाळी ५:०० ते ७:०० या वेळेत हरिपाठ होईल. त्यानंतर सायंकाळी ७:०० ते ९:०० या वेळेत ह.भ.प.रघुनाथ महाराज खेडलेकर यांची कीर्तन सेवा होणार आहे.

रात्री १०:०० वाजता ह.भ.प.योगिराज तुकाराम बाबा संस्थान भजनी मंडळ,खेडलेझुंगे आणि पंचक्रोशीतील भजनी मंडळांच्या वतीने भक्तिमय संगीत भजनाचा कार्यक्रम सादर केला जाईल.

विशेष महाप्रसाद:

या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे येथे वर्षानुवर्षांपासून चालत आलेली महाप्रसादाची परंपरा.

रात्री ९:०० वाजता भाविकांना दह्याची कढी, मालपोहे आणि भात या विशेष महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

या मंगलमय सोहळ्याचा आणि महाप्रसादाचा लाभ पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी घ्यावा,असे आवाहन समस्त ग्रामस्थ,झुंगे बेट यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे