महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लासलगाव उपविभाग येथे दिनांक 4 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय लाईनमन दिवस साजरा
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

न्यायभूमी न्यूज
लासलगांव दि ०४ मार्च प्रतिनिधी हरिष भागवत
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लासलगाव उपविभाग येथे दिनांक 4 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाची प्रेरणा ही माननीय कार्यकारी अभियंता चांदवड विभागीय कार्यालय श्री केशव काळू माळी यांच्या संकल्पनेतून व चांदवड विभागीय कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री सुनील रहिंंज यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम पार पडला प्रमुख पाहुणे विद्युत निरीक्षक कार्यालयातील सहाय्यक अभियंता चेतन चौधरी सर व सचिन पाटील सर व लासलगाव उपविभागीय कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता ज्ञानेश बागुल यांनी देखील तंत्र कर्मचाऱ्यांना लाईनमन दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सारोळा कक्षाचे सहाय्यक अभियंता निकम साहेब विंचूर कक्षाचे काकड साहेब देवगाव कक्षाचे राजपूत साहेब लासलगाव शहर कक्षाचे साळवे साहेब उपस्थित होते.
सदर प्रसंगी सदर प्रसंगी सचिन पाटील साहेब यांनी विना अपघाता विषयी मार्गदर्शन केले तसेच सुनील रहींज साहेब यांनी अध्यक्ष व भाषणात सुरक्षा विषयक साधनांचा वापर करून विना अपघात सेवा कशी करावी.
याबाबत सविस्तर मार्गदर्शन तसेच काही तांत्रिक कर्मचाऱ्यांनी विना अपघात सेवा केल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश जोशी चांदवड विभागीय कार्यालय यांनी केले.