Breaking
महाराष्ट्र

लासलगाव येथे टाकळी विंचूर परिसरात चोरांचा धुमाकुळ

साईनगर मधील घरामध्ये धाडसी चोरी मुळे परिसरात खळबळ

1 1 1 7 7 5

न्यायभूमी 

 लासलगाव दि.२७ जुलै प्रतिनिधी  कैलास उपाध्ये  / निशिकांत पानसरे

लासलगाव येथील साई मंदिराच्या समोर असलेले साईनगर येथील ऋषिकेश साप्ते यांच्या घरी काल रात्री चोरांनी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत,घरात मोठी धाडसी चोरी करण्यात आल्याचे उघडकीस आले.

घरातून दोन तोळ्या ची सोन्याची पोत तसेच काही चांदीच्या मूर्ती व 10000 अशी रोख रक्कम चोरी गेली अशी माहिती मिळाली आहे.

लासलगाव पोलीस ठाण्यात हा बद्दल माहिती देण्यात आल्या नंतर घटना स्थळी पोलिस दाखल झाले असून पुढील तपास कसून करण्यात येत आहे.

दरम्यान  लासलगाव परिसरात वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी मंदिरांमध्ये ताबडतोब सीसीटीव्ही (CCTV) बसवण्याचे आवाहन केले आहे.

रात्रीची गस्त करण्यात यावी तसेच ग्रामीण भागात सुरक्षेसाठी ग्रामरक्षक दलाची स्थापना करून रात्रीची गस्त वाढवण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मौल्यवान दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्याचा व संशयास्पद हालचाल दिसल्यास लासलगाव पोलीस ठाण्यात संपर्क करावा.

अशी माहिती लासलगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक निरीक्षक सागर कोते यांनी केले आहे.

2/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 1 7 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे