Breaking
महाराष्ट्र

नायलॉन मांजामुळे विंचूर येथे तरुणाचा गळा चिरला

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 7

न्यायभूमी न्यूज 

विंचूर दि १४ जानेवारी मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

विंचूर येथील नायलॉन मांजाला बंदी असताना अवैध मांजा विक्री होऊन विंचूर मध्ये मकर संक्रांत उत्सव सुरू असताना मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी नायलॉन मांजा गळ्याला अडकल्याने गंभीर दुखापत होऊन तरुणाचा गळा चिरल्याने तब्बल ४१ टाके पडले आहे.

मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला लासलगाव-विंचूर रस्त्यावरील होळकर वेशीजवळ घटना घडली होती.

बहिणीला भेटण्यासाठी जात असलेल्या रेहान शेख (१६) या तरुणाच्या गळ्याला मांजा अडकल्याने गळा खोलवर चिरला गेला. तातडीने त्याला लासलगांव येथे रुग्णालयात दाखल करून वेळीच ताबडतोब उपचार झाल्याने तरुणाचे प्राण वाचले आहे.

तरुणाच्या मानेच्या नसला मोठी दुखापत झाली होती परंतु त्या ठिकाणी डॉक्टर उपस्थित होते त्यामुळे लवकर इलाज होऊ शकला. नायलॉन मांजा बंद असताना प्रशासनाची करडी नजर असताना देखील तो विक्री होत असल्याने व्यावसाईकांच्या नफेखोरीच्या विरोधात नागरिकांमध्ये त्रिव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या घटनेचे पडसाद पूर्ण विंचूर शहरात उमटल्याने विंचूर शहरात नायलॉन मांजा वापरू नका अशी मोहीम सुरू झाली होती.

परिसरातील तरुणांनी याला पाठिंबा देत येथील बजरंग मंडळामध्ये तरुणानी नायलॉन मांजा कात्रीने कापून नायलान मांजा वापरू नका असे आवाहन केले होते.

5/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे