0
8
9
9
5
7
न्यायभूमी न्यूज
छत्रपती संभाजीनगर दि २५ मार्च विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर शहरात आगामी सण, उत्सव आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आल्याचे आदेश पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी जारी केले आहे.
शस्त्रे,स्फोटक पदार्थ,दगडफेक,ध्वनिक्षेपकांचा वापर,उत्तेजित करणारी भाषणे व घोषणांवर बंदी असेल.
पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास,मोर्चा किंवा आंदोलन करण्यास मनाई असेल.
धार्मिक किंवा सामाजिक स्थळांवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. हा आदेश २५ मार्च २०२५ पासून ८ एप्रिल २०२५ पर्यंत लागू असेल.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कलम १३५ अन्वये कडक कारवाई केली जाईल.
असा इशारा पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी दिला आहे.
0
8
9
9
5
7



