साईबाबा संस्थानच्या प्रसादालयातील अन्नाच्या दर्जाबाबत काँग्रेस नेते सचिन होळकर यांनी दाखल केली तक्रार
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
नासिक दि २४ जुलै विशेष प्रतिनिधी निशिकांत पानसरे
शिर्डी येथील साईबाबा हे जागतिक दर्जाचे दैवत आहे. भारतातून हजारो लोक रोज शिर्डी येथे दर्शनासाठी येतात.
संस्थानाच्या वतीने भाविकांसाठी प्रसादालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थानातर्फे मोफत तसेच सशुल्क भोजन उपलब्ध असते.
मात्र गेल्या काही महिन्यांपासून नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस सचिन आत्माराम होळकर यांच्याकडे सदर प्रसादालयातील अन्नाच्या दर्जाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने होळकर यांनी स्वतः प्रसादालयातील अन्नाचा दर्जा तपासला मात्र प्रसादालातून दिल्या जाणाऱ्या चपात्या,भात, पोळी वरण,भाजी हे सर्व पदार्थ निकृष्ट दर्जाचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
सदर बाब ही गंभीर असल्याने त्यांनी याबाबत अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ त्याचप्रमाणे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,पर्यटन मंत्री तसेच साईबाबा संस्थानच्या मेलवर आपली तक्रार दाखल केली.
दोन दिवसात साईबाबा संस्थान कडून त्यांना प्रतिसाद मिळाला.
संस्थानातील अधिकाऱ्यांसोबत होळकर यांचे सविस्तर बोलणे झाले.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून देखील होळकर यांना प्रतिसाद आला त्याचप्रमाणे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून देखील याबाबत दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन होळकर यांना दिले.
श्रद्धेपोटी येणाऱ्या भाविकांना कडक चपात्या,न शिजलेला भात,भरमसाठ पाणी असणारे भाज्या आणि वरण यासारखे पदार्थ खाऊ घालने ही बाब अत्यंत गंभीर असल्याने यातून विषबाधेसारखा प्रकार होऊ शकतो.
त्यामुळे अन्न देताना मोठ्या प्रमाणात काळजी घेणे आवश्यक आहे.
जोपर्यंत प्रसादालयातील अन्नाचा दर्जा सुधारत नाही तोपर्यंत याबाबतीचा पाठपुरावा सातत्याने करत राहू असे मत काँग्रेस नेते सचिन होळकर यांनी व्यक्त केले.