तरुण नेतृत्वाचा उदय : डोंगरगाव गणात योगेश भोसले व राजेश भडांगे चर्चेत
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी न्यूज
विंचूर :- दि.१८ ऑक्टोंबर दत्तात्रय दरेकर
तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असून,तरुणांमध्ये नव्या जोमाने राजकारणात उतरण्याची तयारी सुरू आहे.
पारंपरिक नेत्यांच्या सावलीत वाढलेल्या तरुण पिढीने आता स्वतःचे नेतृत्व निर्माण करण्याचा निर्धार केला आहे.

या निवडणुकीत अनेक नव्या चेहऱ्यांची चर्चा रंगत असून,योगेश भोसले व राजेश भडांगे या तरुणांची नावे विशेषतः डोंगरगाव गणात अग्रस्थानी दिसत आहेत.
दोघेही सामाजिक कार्यातून घडलेले असून, जनतेत आपली वेगळी छाप निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत.
जनतेत पारंपरिक राजकारण्यांविषयी नाराजीचे वातावरण असताना,नव्या नेतृत्वाकडून परिवर्तनाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
तरुण वर्गाची राजकारणात वाढती भागीदारी पाहता,आगामी निवडणुकांमधून समाजकारणाला नवा वेग मिळण्याची चिन्हे आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून नव्या चेहऱ्यांच्या माध्यमातून गावपातळीवरील राजकारणात ताजेपणा येईल,असा विश्वास मतदार व्यक्त करत आहेत.