न्यायभूमी खडक माळेगाव दि.१४ सप्टेंबर
महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा नुकत्याच तिसगाव येथे पार पडल्या.
या स्पर्धेत चांदवड तालुक्यातील 17 वर्षांखालील मुलींच्या गटात मराठा विद्या प्रसारक समाज संस्था नाशिक संचलित योगीराज हरेकृष्ण बाबा जनता विद्यालय,देवरगाव ता.चांदवड येथील कबड्डी संघाने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.

तालुक्यातील एकूण ३५ संघांमध्ये देवरगावच्या विद्यार्थिनींनी संघातील खेळाडु – संचिता शिंदे,वृंदा शिंदे,अनुष्का कुरणे,स्नेहल शिंदे,अक्षदा माळी,तृप्ती शिंदे,प्रियंका शिंदे,वैष्णवी कंक,गौरी पवार चुरशीच्या स्पर्धेत बाजी मारली.
संघाला विद्यालयाचे शिक्षक शामराव पगार यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल चांदवड तालुका संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड, शालेय समितीचे अध्यक्ष रामराव मोरे व सर्व सदस्य,मुख्याध्यापिका सौ. कल्पना मोरे,तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
यावेळी देवरगावातील काही ग्रामस्थांनी विजयी संघास रोख स्वरूपात देणगी दिली,तर भारतीय जवान विकास बाळासाहेब नरसिंगे यांनी आपल्या आजोबांच्या स्मृती प्रित्यर्थ 12 संपूर्ण स्पोर्ट्स गणवेश संघास देऊ केले.