Breaking
आरोग्य व शिक्षण

मराठा विद्या प्रसारक समाज जनता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात करिअर मार्गदर्शन 

न्यायभूमी सहसंपादक सुनील पोळ 

1 1 9 9 9 1

वडाळीभोई दि.०७ सप्टेंबर 

 वडाळीभोई येथे महाराष्ट्र राज्य गिरीजा महिला मंच सदस्य सौ.सविता दरेकर (कवयित्री, लेखिका) यांनी  महाविद्यालयात करियर मार्गदर्शन अभियानांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

भावनिक बुद्धिमत्ता यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली” या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला नोकरी म्हणजे करिअर नव्हे. तर त्यासाठी आवडते छंद जोपासणे आवड असणारे क्षेत्रात रस निर्माण करणे, वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन घेणे.

तसेच खेड्यातील वातावरण हे अभ्यासासाठी पूरक आहे निसर्ग निर्मित आहे कुठलाही छंद हा मनापासून जर जोपासला तर मनुष्य त्यात नक्कीच यशस्वी होतो असेही त्यांनी सांगितले.

तसेच तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेला विद्यार्थी व्हाट्सअप ,इन्स्टा, फेसबुक यामध्ये फक्त वेळ घालवण्यासाठी नाहीतर वेळेचा सदुपयोग करण्यासाठी या साधनांचा वापर करावा असेही त्या व्याख्यानात म्हणाल्या. त्यांच्या सुरेल कवितांचे गायनही त्यांनी त्यावेळी करून दाखवले. या कार्यक्रमादरम्यान कनिष्ठ विभाग प्रमुख प्राध्यापक श्री कोल्हे .एस. व्ही, प्राध्यापक श्री गांगुर्डे एम.पी. प्राध्यापक श्री ठाकरे ए. एस. प्राध्यापिका श्रीमती कुंभार्डे एस. एस., प्राध्यापक श्री कासव एस.टी.तसेच ज्युनिअर कॉलेजचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गांगुर्डे एम.पी यांनी केले.तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापिका श्रीमती कुंभार्डे एस.एस.यांनी केले.

अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 9 9 9 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे