Breaking
गुन्हेगारी

निफाड भूमी अभिलेख लाच प्रकरणातील मुख्य सुत्रधार भूमि अभिलेख अधिकारी भाबड यांच्यासह शिपाई यांना निलंबित करुन त्यांची संपत्ती जप्त करावी

छत्रपती युवा सेना संघटनेची मागणी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

0 9 5 3 0 3

न्यायभूमी न्यूज 

नासिक (निफाड) दि १२ मार्च मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

निफाड भूमिअभिलेख कार्यालयात शिपाई मार्फत लाच मागणाऱ्या मुख्य सूत्रधार उपअधिक्षक श्री.भाबड यांना त्वरित निलंबित करण्याची कार्यवाही करावी तसेच शिपाई श्री नितेंद्र गाडे व उपअधिक्षक श्री भाबड यांची उच्चस्तरीय चौकशी करावी.

तसेच त्यांची संपत्ती जप्त करण्यात यावी.अशी मागणी आज छत्रपती युवा सेनेच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी यांना करण्यात आली.

भुमी अभिलेख अधिकारी भाबड यांच्यावर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल याची असा इशाराही छत्रपती युवा सेनेच्या वतीने देण्यात आला.

यावेळी छत्रपती युवा सेनेचे प्रदेश प्रवक्ते तथा संपर्कप्रमुख यश भाऊ बच्छाव,प्रदेश सरचिटणीस निकेश पाटील,नाशिक जिल्हाध्यक्ष किशोर वडजे, महानगरप्रमुख मंगेश कापसे,शिक्षक आघाडी प्रमुख राहुल सर पगारे याच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 3 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे