Breaking
आरोग्य व शिक्षण

ताहाराबाद विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 9 4

न्यायभूमी न्यूज 

ताहाराबाद  दि २४ जानेवारी 

ताहाराबाद येथील मविप्र संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज,ताहाराबाद विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापिका श्रीमती आर. आर. सोनवणे ह्या होत्या. तसेच विचारमंचावर प्रभारी पर्यवेक्षक श्री. एस. के. निकम उपस्थित होते.

        कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपमुख्याध्यापिका श्रीमती आर.आर सोनवणे यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी नेताजींच्या स्वातंत्र्य विषयक कार्याची माहिती दिली.

या वेळी उपशिक्षक जे. एल. गावित,के. एम. मोरे,के. जी. अहिरे,के. बी. चव्हाण, श्रीमती पी.पी माटे,श्रीमती एस. बी.रौंदळ, एस.आर. दळवी,राहुल संसारे, श्रीमती एस. यू. भामरे, सीमा पवार,एस.पी.देवरे, राहुल पगार, श्रीमती एस. व्ही. सूर्यवंशी,जयदीप मोरे,डी.व्ही. सोनवणे, एल.यु.साळवे, वाय. व्ही. पवार ,सुनील देवरे, सखाराम अहिरे, कुणाल देवरे,मंगेश पगारे आदी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक जितेंद्र बच्छाव यांनी तसेच आभार के. एम. मोरे यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे