जाणता राजा कॉलनीत श्री ओंकारेश्वर महादेवाची भव्य प्राणप्रतिष्ठा
या मंदिरात रोज जेष्ठ नागरिक म्हणतात हरिपाठ
न्यायभूमी न्यूज
विचूर (नासिक) दि.३१ सुनील क्षिरसागर( विशेष प्रतिनिधी)
नासिक येथील जाणता राजा कॉलनीमधील सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने या कॉलनीत श्री ओंकारेश्वर महादेव मूर्ती ची प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच पार पडला.
यावेळी श्री पार्वती माता, ओंकारेश्वर महादेव व नंदी यांची भव्य मिरवणूक व कलश यात्रा संपन्न होऊन या कार्यक्रमांतर्गत विविध होमावदी विधी, पूजा श्री महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज, यज्ञाचार्य पंडित कृष्णा प्रताप ब्रुज महान प्रसाद चतुर्वेदी या संत महंत यांच्या हस्ते या ओंकारेश्वर महादेवाची प्राणप्रतिष्ठा यथा सांग पार पडली.

या नूतन मंदिरात ज्येष्ठ आजी- आजोबा यांच्याकडून पहाटे व सायंकाळी देव- देवतांचे स्तोत्र,हरिपाठ व भजनांचा कार्यक्रम रोज होत असतो.
या रोजच्या दैनंदिन कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहणारे ज्येष्ठ आजी -आजोबा
सुभाष गायकवाड बाबा,भागवत सर,मिसर बाबा व मिसर आजी,खांदवे बाबा व खांदवे आजी, परदेशी बाबा,गायकर बाबा,पाटील बाबा,श्रीम. कदम आजी,पाटील आजी,पटेल भाभी, आरळकर आजी,कांगणे आजी,पवार आजी व आदी महिला मंडळ.