Breaking
महाराष्ट्र

महामार्ग ठप्प करून संतापाचा स्फोट! मधुकर गायकर यांच्या कथित बेकायदेशीर खरेदी विरोधात तुफान रस्ता रोको

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 0 0 0 1

न्यायभूमी

विंचूर दि.१२ फेब्रुवारी मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर 

नाशिक–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर विंचूर येथे आज ग्रामस्थांनी संतप्त होत तुफान रस्ता रोको आंदोलन छेडले.जवळपास एक तास महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, जिल्हा परिषद शाळेच्या गट नं. ६२७ मधील जमीन श्री.मधुकर रामचंद्र गायकर(निमगाव) यांनी कथितरित्या खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

ही खरेदी बेकायदेशीर असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

याचबरोबर, विष्णूनगर येथील गावाची सार्वजनिक पाण्याची विहीर तसेच शेततळे देखील बेकायदेशीररित्या खरेदी केल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

संबंधित खरेदी तात्काळ रद्द करून खरेदीदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.

दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून प्रशासनाच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

3.2/5 - (4 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे