पाचोरा येथील भागवत कथेला भाविकांची गर्दी
पहिल्याच दिवशी पाच हजारांहून अधिक भाविकांची हजेरी
न्यायभूमी न्यूज
लासलगाव पाचोरे बु.: दि ०७ फेब्रुवारी विशाल उगलमूगले
श्रीमद् भागवत कथा सोहळ्याला बुधवारी (दि. ५) उत्साहात प्रारंभ झाला. पाचोरा आणि पंचक्रोशीतील भाविकांनी पहिल्याच दिवशी कथेला मोठी गर्दी केली. पाच हजारांहून अधिक भाविकांनी हजेरी लावली.
कथा सोहळ्याचे ध्वजारोहण प. पु. प. म. श्री. मालेराज चिरडे बाबा यांच्या हस्ते, तर कथा सभागृहाचे उद्घाटन प. पु. प. म. श्री. मयंकराज बाबा महानुभाव यांच्या हस्ते करण्यात आले. प. पु. प. म. श्री चिरडे बाबा यांच्या मुखातून श्रीमद्
भागवत कथेचे संगीतमय विवेचन करण्यात आले. भागवत कथेचे महत्त्व विशद करताना चिरडे बाबा म्हणाले, “भागवत कथा म्हणजे भगीरथी आहे. गंगास्नानाने केवळ त्वचा शुद्ध होते, पण मनाची स्वच्छता करण्यासाठी भागवत कथा हा एकमेव मार्ग आहे.
या कथेच्या श्रवणाने आपल्या पूर्वजांचा उद्धार होतो. जो भक्त श्रीकृष्णाला शरण जातो, त्याचे विधी लिखित मरणही टळते.” राजा परीक्षितीच्या कथेचे उदाहरण त्यांनी यावेळी सांगितले.
या कथासोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. पहिल्या दिवसाच्या कथेतील विशेष आकर्षण म्हणजे लकी ड्रॉच्या माध्यमातून ११ महिलांना पैठण्यांचे वाटप करण्यात आले.



