Breaking
महाराष्ट्र

जनता विद्यालयात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

न्यायभूमी न्यूज सहसंपादक सुनील पोळ 

1 1 2 2 3 6

न्यायभूमी 

वडाळीभोई दि.२९ जुलै 

         येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्था नाशिक संचलित जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि अभिनव बाल विकास मंदिर वडाळीभोई येथे दिनांक 29 जुलै 2026 रोजी गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला उजागर करणारा दिवस गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मुलाधार असलेले महर्षी व्यास यांच्या सन्मानार्थ तसेच प्रत्येक शिष्याने आपल्या गुरुप्रति ऋण व्यक्त करण्यासाठी व्यासपोर्णिमा साजरी करण्यात येते.आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ संगीता सोनवणे यांनी भूषविले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामधून कु सायली जाधव हिने आजच्या दिवसाचे पावित्र्य साजरा करण्याचा उद्देश व महत्त्व स्पष्ट केले.

यानंतर मुख्याध्यापिका सौ संगीता सोनवणे यांनी महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण केली तर उपस्थित सर्वांनीच प्रतिमेचे पूजन केले.यावेळी शालेय गीतमंचाने गुरूंविषयी आदर,आस्था,सन्मान व्यक्त करणारे सुंदर गीत सादर केले.

शालेय विद्यार्थी कु आयुष बिडवई, विद्या जाधव आणि अभिनवची चिमुकली कु आराध्या जाधव यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आपले मनोगत व्यक्त करताना गुरूंचा महिमा सांगितला.

शिक्षक मनोगतातून श्री मोहन यशवंते यांनी भारतीय संस्कृतीतील पवित्र चार वेदांची माहिती सांगितली.तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान व्यक्तींची गुरूंठाई असलेली श्रद्धा स्पष्ट करत नवीन पिढीला गुरूंविषयी ऋण,आदर का व्यक्त केले पाहिजे हे पटवून दिले तर अध्यक्षीय भाषणातून बोलताना माननीय मुख्याध्यापिका यांनी जीवनातील गुरूंचे महत्त्व विशद करताना गुरुपौर्णिमेचा अर्थ गोष्टीच्या तसेच काही उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केला आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.आजच्या या खास प्रसंगी इयत्ता 10वी अ व चौथी च्या विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व गुरूंचा पेन व गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.कलाशिक्षक श्री शरद बागले यांचे फलक रेखाटन सर्वांचेच आकर्षण ठरले.

     सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु समृद्धी जाधव आणि कु पूजा आहेर यांनी तर आभार प्रदर्शन कु.शिवम ठोंबरे याने केले.

यावेळी माध्यमिक,उच्च माध्यमिक विद्यालय व अभिनव बाल विकास मंदिरचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर सहकारी बंधू-भगिनी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

2/5 - (3 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 2 2 3 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे