विंचूरमध्ये‘नन्ही कली’उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना टॅब वाटप- शिक्षणात तंत्रज्ञानाचा नवा अध्याय
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
विंचूर (नाशिक) : दि.१० ऑक्टोंबर सुनील क्षीरसागर
विंचूर दि.९ ऑक्टोबर २५ रोजी, केसी महिंद्रा ग्रुप व नांदी फाउंडेशन संचलित ‘नन्ही कली’ प्रकल्पांतर्गत विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय तसेच विंचूर गटातील शाखांमधील विद्यार्थ्यांना टॅब वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष जगदीश जेऊघाले होते. यावेळी विंचूर गटातील सर्व मुख्याध्यापक आणि ‘नन्ही कली’ प्रकल्प समन्वयकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थिनी प्रतिनिधी ईश्वरी शिंदे, रुपेश चौधरी,अनुजा कुशारे आणि स्नेहल जाधव यांनी आपली मनोगते मांडली.
‘नन्ही कली’ प्रकल्पाच्या नाशिक प्रोग्राम ऑफिसर निरंजना पाटील यांनी प्रकल्पाचा उद्देश आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचे महत्त्व स्पष्ट केले.
रयत शिक्षण संस्था,सातारा येथील जनरल बॉडी सदस्य डॉ.सुजित गुंजाळ यांनी प्रकल्पांतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी असलेले महत्त्व अधोरेखित केले.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी सल्लागार समिती सदस्य पंढरीनाथ दरेकर,प्राचार्य नंदकुमार देवढे,मुख्याध्यापक साठे सर,लोणारी सर,राजेंद्र सोनवणे, उपमुख्याध्यापक सुरेश वाबळे, उपमुख्याध्यापिका संगीता भदाणे,कलाशिक्षक वीरेंद्र कांबळे,हेमराज नागापुरे,मौळे,गणेश गायकवाड,आनंदा आहिरे,उमा चव्हाण यांच्यासह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लाईफ मेंबर राजेंद्र चांदे यांनी केले,तर पर्यवेक्षक सुदामराव माळी यांनी आभार मानले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरला आहे.


