Breaking
आरोग्य व शिक्षण

जिल्हा परिषदेचे द्विशिक्षकी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न 

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 2 0 9 7

न्यायभूमी न्यूज 

लासलगाव दि ०२ मार्च सुनील पोळ 

 येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकी खुर्द ता. चांदवड येथे वार्षिक स्नेहसंमेलन 2025 चे आयोजित करण्यात आले होते. शाळा व्यवस्थापन समिती, पालक, विद्यार्थी व शिक्षक यांनी निमंत्रणाची धुरा अंगावर घेत, गावातील प्रत्येक व्यक्तीला निमंत्रित केले.

गावातील महिलांची व मातांची कार्यक्रमास उपस्थिती वाढावी यासाठी चुलबंद निमंत्रण देण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. बाबाजी रामभाऊ जाधव यांनी जेवणाचा सर्वभार उचलत चविष्ट व स्वदिष्ट अशी डाळ बट्टी व लापशीचे जेवण दिले. शाळेची केवळ 40 पटसंख्या असताना शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेत तब्बल 21 डान्स बसविले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना ‘दैवत छत्रपती’ या गाण्याने मान वंदना देत कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी इ. 1 ली ते 4 थी च्या विद्यार्थ्यांनी कोळी नृत्य, आदिवासी नृत्य, शेतकरी नृत्य, देशभक्ती पर नृत्य, महाराष्ट्रातील सण-समारंभांची ओळख करून देणारे नृत्य, लावणी नृत्य, लोक नृत्यासह विविध हिंदी व मराठी गीतावर नृत्ये सादर केली.

विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट डान्सला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बक्षीसची उधळण केली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गावच्या सरपंच सौ. हिराबाई चांगदेव देवढे यांनी भूषविले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. कविताताई धाकराव या लाभल्या.

कार्यक्रमात शाळेसाठी गेली 20 वर्ष सातत्याने आहार शिजवणाऱ्या अंजना किसन सूर्यवंशी यांचा नववार साडी देऊन शाळा व्यवस्थापन समिती तर्फे सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेच्या माजी विद्यार्थिनींनी कु. शुभांगी जाधव, प्राप्ती देवढे, श्रावणी जाधव यांनी केले. शाळेतील आंतरवासिता शिक्षिका सौ. प्रणाली अनिकेत भोळे यांनी विदयार्थ्यांचे उत्कृष्ट डान्स बसविण्यात मोलाचे योगदान दिले.

शाळेस श्री. नवनाथ जाधव यांनी अत्यल्प दरात साउंड सिस्टम व श्री. बबलू जाधव यांनी व्हिडीओ सिस्टम उपलब्ध करून दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. गणेश औटी सर यांनी केले तर समारोप शाळेचे उपशिक्षक श्री. प्रवीण जाधव सर यांनी केला. जेवणासह घेतल्या गेलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

5/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 2 0 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे