Breaking
कृषीवार्ता

विंचूर येथील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 9 5

न्यायभूमी न्यूज

 विंचूर दि ०७ में मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर 

विंचूर: मंगळवार दिनांक 6 मे रोजी विंचूर व परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

     मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अचानक वादळ वारे वाहू लागले व पाच वाजेच्या सुमारास पाऊस पडायला सुरुवात झाली जोरदार अवकाळी पावस सुरु झाल्यामुळे शेतामधील पिके झाकताना शेतकऱ्यांची फारच तारांबळ उडाली व नागरिकांची खूपच पळापळ झाल्याचे पाहायला मिळाले

परिसरात जोरदार अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे व कांदा व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांसह कांदे, भाजीपाला व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गेल्या दोन दिवसापासून विंचूर व परिसरात ढगाळ वातावरण तयार झाले होते. या वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे विंचूर येथील कृषी उत्पन्न बाजार आवारातील सात ते आठ कांदा व धान्य व्यापाऱ्यांचे शेड पडले आहे. 

      कांदा शेड पडल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही शेडमध्ये साठवलेला कांदा खराब झाला तर काही शेड जमीन दोस्त झाल्यामुळे व्यापारी वर्गात आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे