दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी सोबत बैठक
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
रत्नागिरी दि : २८ में
प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने आज रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्यासोबत दिव्यांगांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली.
या बैठकीत दिव्यांगांच्या मूलभूत गरजा, सरकारी योजनांची अंमलबजावणी,सवलती व सुविधा, तसेच रोजगार,शिक्षण व आरोग्य विषयक प्रश्नांवर सखोल चर्चा झाली.
या बैठकीस प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री.आनंद त्रिपाठी,नवी मुंबई जिल्हाध्यक्ष श्री.विशाल वाघमोडे,नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्षा कु.आशा गायकवाड,तसेच ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा काजल ताई उपस्थित होत्या.

दिव्यांगांच्या विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले असून,लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा संघटनेकडून व्यक्त करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांनीही निवेदनातील मागण्या गांभीर्याने घेत तातडीने कार्यवाहीचे आश्वासन दिले.



