जाहीर निषेध !!! जाहीर निषेध !!! जाहीर निषेध !!! सविस्तर वृत्त
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
चादवड दि १८ नोव्हेंबर

आजच्या डिजिटल युगात निषेध व्यक्त करणे सोशल मीडियावर सहज शक्य झाले आहे… परंतु,हिंदु समाजातील निरपराध बालिकेवर घडलेल्या अशा हृदयद्रावक,असह्य आणि मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनेविरोधात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आवाज उठवणे हेच खरे कर्तव्य आहे.
दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ रोजी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हिंदु समाजातील एकता,संवेदना आणि न्यायासाठीची आपली जागरूकता दाखविण्यासाठी आपण सर्व हिंदू समाजबांधव एकत्र येत आहोत.
तरी,चांदवड तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने समस्त चांदवडकरांना,महिलावर्गाला,तरुणांना आवाहन करण्यात येते की आपण पण ह्या घटने विरोधात मूक मोर्चात सहभागी व्हावे.
उद्या बुधवार दिनांक १९.११.२०२५ रोजी सकाळी ठीक ११ वाजता बाजारातळ येथे सर्वांनी जमावे,तेथून सोमवार पेठ मार्गे तहसील कार्यालयावर मूक मोर्चा नेवून पोलीस स्टेशन आणि तहसीलदारांना निवेदन द्यायचे आहे.
तरी समस्त चांदवडकरांनी त्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चात सहभागी व्हावे.
समस्त सकल हिंदू समाज,चांदवड शहर