Breaking
महाराष्ट्र

कृष्णवाडी येथे मच्छिंद्रनाथ देवस्थानाचा होमाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

Nyaybhumi news

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज

विंचूर (नाशिक) : दि ०१ एप्रिल विशेष प्रतिनिधी सुनील क्षीरसागर

विंचूर पासून जवळच असलेले कृष्णवाडी (किसनवाडी) येथील श्री मच्छिंद्रनाथ मंदिरात सालाबाद प्रमाणे (वर्षं ११ वे) श्री रामनाथ बाबा कांडेकर यांच्या आशीर्वादाने व श्री रामदास बाबा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली,अग्निहोम व लाही प्रसाद कार्यक्रम रात्री उशिरा पर्यंत विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला.

  गुढीपाडवा या दिवशी मूर्ती पूजा, सायं.६:००वा.धुप, महाआरती व नैवेद्य, सायं. ७:०० वा. महाप्रसाद व रात्री ९:००वा. अग्निहोम व लाही प्रसाद कार्यक्रम आणि शाहिर किसन पिठे (चापडगावकर) यांचा नाथ भक्ती पर गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. 

यावेळी या कार्यक्रमात मान्यवरांना श्रीफळ व शाल देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला कृष्णवाडी पंचक्रोशीतील व दूरदूर वरून आलेले हजारो भाविकांनी दर्शनाचा, होमाचा (रहाडीचा) व महाप्रसादाचा लाभ घेतला.

या महाप्रसादाचे मानकरी सुयोग वाटपाडे, नाशिक हे होते.

या कार्यक्रमात राजकीय, सामाजिक, जेष्ठ, नाथ भक्तवृंद तसेच महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

या कार्यक्रमासाठी किसनवाडी नाथ भक्त परिवार व विंचूर जय मल्हार भक्त परिवार यांचे मोठे योगदान होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे