Breaking
कृषीवार्ता

वडझिरे मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना सप्ताह संपन्न!!!

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 8 7

न्यायभूमी न्यूज 

सिन्नर. दि ०९ जुलै प्रतिनिधी – सुयोग वाजे

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सिन्नर तालुक्यातील वडझिरे या गावी प्रधानमंत्री फसल बीमा सप्ताह साजरा करण्यात आला.

सन २०२५/२६ करता नाशिक जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीला काम मिळाले असून गावामध्ये प्रतिष्ठित शेतकरी व महिला बचत गट यांना पीक विमा मध्ये सहभागी करून घेण्याविषयी सविस्तर माहिती दिली व योजना समजून सांगितली.

यात बाजरी मका सोयाबीन कांदा या पिकांची संरक्षित रक्कम व विमा हप्ता या संदर्भात संपूर्ण माहिती व सविस्तर चर्चा करण्यात आली.

मार्गदर्शन करण्याकरिता कृषी विभागाचे उप कृषी अधिकारी रणजीत आंधळे साहेब तसेच भारतीय विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब रायकर,सिन्नर तालुका प्रतिनिधी सुयोग वाजे व कृषी सहाय्यक अश्विनी भदाने मॅडम या ही उपस्थित होत्या.

या सर्वांनी शेतकऱ्यांना आपल्या पेरणी केलेल्या पिकाचे शंभर टक्के पिक विमा काढून घेण्याचे आव्हान केले आहे.तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पिक विमा योजनेत सहभागी होऊन पावसामुळे होणाऱ्या अतिवृष्टी,गारपीट,व उत्पन्न कमी येणाऱ्या या घटकांमधून होणाऱ्या नुकसानी करिता संरक्षण मिळण्यासाठी पिक विमा हा खूप महत्त्वाचा भाग आहे.

हे या बैठकीमध्ये सांगितले गेले.गावातून सरपंच सुनीता नागरे, ग्रा प सदस्य बाळासाहेब बोडके रामेश्वर बोडके, सुनील नागरे, छाया नागरे, कमलाबाई नागरे या महिला शेतकरी व शेतकरी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे