एस.एन.डी.इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल चे क्रीडा क्षेत्रात यश
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
येवला दि.०४ जानेवारी पुष्पा पाटील
खेल मंत्रालय भारत सरकार द्वारा आयोजित मेरा युवा भारत नाशिक व सावली समाजसेवी बहुउद्देशीय संस्था पाटोदा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रीडा स्पर्धांचे शिस्तबद्ध नियोजन एस. एस एम.व्ही.बाभूळगाव विद्यालयाच्याच्या क्रीडांगणावर करण्यात आले होते.
सदर स्पर्धेचे आयोजन नाशिक जिल्हा मेरा युवा भारत अधिकारी अशोक कुमार मेघवाल, कोषाध्यक्ष सुनील पंजे,व जगदंबा शिक्षण संस्था सचिव लक्ष्मण भाऊ दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.सदर स्पर्धेसाठी विविध विद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.
यात एस.एन.डी.इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी १०० मीटर २०० मीटर धावणे,गोळा फेक,कबड्डी,खो खो या खेळात १९ वर्ष वयोगटा खालील गटात सक्रीय सहभाग नोंदविला होता.
तेव्हा वैयक्तिक क्रीडा प्रकारात १०० मी धावण्याच्या स्पर्धेत मुलींमधून तन्वी भोये हिने तिसरा क्रमांक मिळविला तर मुलांमधून प्रथम क्रमांक सार्थक गायकवाड,द्वितीय क्रमांक शुभम चौधरी व तृतीय क्रमांक आकाश शिद यांनी मिळविला यापैकी सार्थक गायकवाड याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
गोळा फेक स्पर्धेसाठी मुलांमधे सार्थक गायकवाड याने तिसरा क्रमांक मिळविला आहे.याचप्रमाणे सांघिक क्रीडा प्रकार खो-खो मुलींच्या क्रीडाप्रकारात विरुद्ध बाजूच्या मुलींच्या संघाला अंतिम फेरीत दणदणीत पराभूत करत प्रथम क्रमांक मिळविला.
तसेच कबड्डी क्रीडा प्रकारात एस.एन.डी.इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल बाभूळगाव मुलीच्या संघाने दुसरा क्रमांक मिळवून जिल्हास्तरावर नाव निश्चित केले आहे. याप्रमाणे सांघिक खेळात मुलींच्या संघाची खो-खो साठी जिल्हास्तरीय निवड झाली असून सर्व क्रीडा प्रकारातील बाजी मारलेल्या विजेते वैयक्तिक व सांघिक खेळाडू हे येवला क्लस्टरचे प्रतिनिधी म्हणून नाशिक जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होतील अशी माहिती स्थानिक आयोजक संस्था सचिव महेश शेटे यांनी दिली.
याप्रसंगी पारितोषिक प्रमाणपत्र वितरणसाठी प्रमुख पाहुणे म्हणून एस.एस.एम.व्ही विद्यालय बाभूळगाव चे प्राचार्य श्री गोरख येवले सर, खोकले सर, क्रीडा प्रशिक्षक सागर मुटेकर, एस.एन.डी इंग्लिश मीडियम स्कूल व जूनियर कॉलेजचे प्राचार्य निलेश शिंदे सर उपस्थित होते. सर्व विजेते स्पर्धकांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक संचित कानडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
पुढील वाटचालीसाठी जगदंबा एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री. रुपेश भाऊ दराडे यांनी शुभेच्छा देत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.