लासलगावमध्ये ४५ हजारांची रोकड लंपास; दिशाभूल करून फसवणूक केल्याची घटना!
बँक ऑफ इंडिया परिसरातील घटना; रोकड आणताना व नेताना नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
न्यायभूमी
लासलगाव :दिनांक १७ नोव्हेंबर लासलगाव येथील बँक ऑफ इंडिया शेजारील गल्ली परिसरात संतोष कंपनीचे मालक अण्णा यांची दिशाभूल करून अज्ञात व्यक्तीने ४५ हजार रुपयांची रोकड पळवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
बँकेतून मोठी रक्कम काढताना किंवा रोकड घेऊन जाताना नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. शक्यतो विश्वासू व्यक्तीला सोबत ठेवावे. अनोळखी व्यक्तींच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही प्रकारच्या आमिषाला किंवा हुलथापांना बळी पडू नये.
सध्या आर्थिक अडचणींच्या काळात अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांपासून नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी.
नागरिकांनी सतर्क राहावे, स्वतःच्या पैशांची सुरक्षितता जपावी आणि अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
सावधानता हाच सुरक्षिततेचा पहिला उपाय!




