Breaking
महाराष्ट्र

निफाड तालुक्यातील देवगाव,कानळद,मरळगोई,खडक माळेगाव व विंचूर येथे महावितरण कंपनी ३३/११ के.व्हि.सब स्टेशन येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

विंचूर दि २२ जून अभय पाटील 

शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी व वीज ही महत्त्वाची गरज आहे.पाऊस सुरू झाल्यामुळे खरिप हंगामाची कामे सुरू झाली आहे.

महावितरणच्या माध्यमातून आज कार्यान्वित झालेल्या रोहित्रांच्या माध्यमातून शेतकरी व नागरिकांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार आहे,असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

आज निफाड तालुक्यातील देवगाव,कानळद, मरळगोई,खडक माळेगाव व विंचूर येथे महावितरणच्या विविध विकास कामांचे भूमी पूजन व लोकर्पण मंत्री श्री भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडी, महावितरणचे कार्यकारी अभियंता के.व्हि.काळुमाळी,उपकार्यकारी अभियंता दत्तात्रय पुंडे सहाय्यक अभियंता किरण काकड, नितीन निकम,भालेराव,दिव्या पवार,सुनील राऊत,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर,लासलगाव बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप,संचालक डॉ.श्रीकांत आवारे,संचालक तानाजी आंधळे,भाऊसाहेब बोचरे,शिवाजी सुपनर,विनोद जोशी,सरपंच दत्तूपंत डुकरे,सरपंच बाळासाहेब पुंड सरपंच दत्तात्रय घोटेकर,सरपंच संदीप गारे,सरपंच सचिन दरेकर,सरपंच संजय घायाळ,दत्तात्रय रायते,गोरख शिंदे,सुरेखा नागरे, मंगेश गवळी,अरुण घुगे,तुकाराम गांगुर्डे,अशोक नागरे,पांडुरंग राऊत,विलास गोरे,बालेश जाधव, योगेश साबळे,बबन शिंदे,राहुल डुंबरे,अनिल सोनवणे,किशोर जेऊघाले,माधव जगताप,शिवाजी जाधव,प्रकाश घोटेकर,राहुल आहेर,भाऊसाहेब पारखे,मिलिंद पगारे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

महावितरणच्या आरडीएसएस लॉस रीडक्शन योजनेअंतर्गत एबीकेबल टाकण्यात येऊन कंडक्टर बदलणे,अपग्रेड करणे ही कामे करण्यात येत आहे.

त्यानंतर रोहीत्रांवरील अनधिकृत भार कमी होऊन रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण कमी होणार आहे.

निफाड तालुक्यातील खडक माळेगाव विद्युत उपकेंद्रात अतिरिक्त ५ एमव्हीए व मरळगोई विद्युत उपकेंद्रात अतिरिक्त ५ एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त रोहित्र आज कार्यान्वित करण्यात आले आहे.

लवकरच मतदारसंघातील संपूर्ण विद्युत केंद्रांचे बळकटीकरण होऊन ग्राहकांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार असल्याचे कार्यकारी अभियंता काळुमाळी यांनी प्रास्ताविकात सांगितले.

मंत्री श्री.भुजबळ यांच्या हस्ते या कामांचे झाले भूमीपूजन व लोकार्पण देवगाव येथे ५ एम.व्ही.ए.चे विद्युत उपकेंद्रामध्ये रोहित्राची क्षमता १० एम.व्ही.ए करणे या कामाचे भुमीपूजन.(र.रु.१७८.०४ लक्ष)

कानळद येथे ५ एम.व्ही.ए.चे विद्युत उपकेंद्रामध्ये रोहित्राची क्षमता १० एम.व्ही.ए करणे कामाचे भुमीपूजन. (र.रु. १४२.५७ लक्ष)

मरळगोई येथे कृषी आकस्मितता निधीमधुन ५ एम.व्हि.ए.चा अतिरिक्तं रोहीत्र बसविणे उद्घाटन (र.रु.१५०.५२ लक्ष) (मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी योजना)

खडकमाळेगांव येथे कृषी आकस्मितता निधीमधुन ५ एम.व्हि.ए. चा अतिरिक्ता रोहीत्र बसविणे उद्घाटन.(र.रु.१३९.६९ लक्ष) (मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी योजना)

विंचूर येथे कृषी आकस्मितता निधीमधुन ५ एम.व्हि.ए.चा अतिरिक्तष रोहीत्र बसविणे कामाचे भुमीपूजन.(र.रु. १२८.२७ लक्ष) (मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी योजना)

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे