Breaking
आरोग्य व शिक्षण

जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शाळेतील निवडणूक प्रकियेच्या बॅलेट पेपर वरील अनुभव

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

निफाड नांदुर्डी दि २५ जुलै मिनाताई शेटे

नांदुर्डी ता निफाड:- उपक्रमशील शाळा जनता विद्यालय चे मुख्याध्यापक श्री.म्हसकर बी डी पर्यवेक्षिका रणशूर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमशील शिक्षक श्री आहेर एस आर सर यांच्या संकल्पनेतून निवडणूक समिती प्रमुख शेंडे यू बी यांच्या प्रयत्नातून लोकशाहीचा सर्वात महत्वाचा घटक निवडणूक प्रक्रियेची विध्यार्थ्यांना माहिती व्हावी व लोकशाही बळकट करण्यासाठी शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक प्रत्यक्ष मतदान पद्धतीने घेण्यात आली.

या निवडणुकीसाठी निवडणूक कृतिकार्यक्रम निश्चित करण्यात आला निवडणूक नियमावली निश्चित करून मतदार पात्रता,उमेदवार पात्रता आधार कार्ड, ओळखपत्र वैयक्तिक माहिती अशी नियमावली ठरवून उपपंतप्रधान,क्रीडा व शिस्त मंत्री,आरोग्य मंत्री,अभ्यासमंत्री,सांस्कृतिक मंत्री, अर्थमंत्री,सहलमंत्री,परिपाठ मंत्री,हरित सेना व पर्यावरण मंत्री,वाचनालय मंत्री,शालेय पोषण आहार मंत्री अशा १३ पदांसाठी 220अर्ज प्राप्त झाले.

त्यापैकी 14 जणांनी माघार घेतली सहा जणांचे अर्ज अपात्र ठरले असे 200 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले.

अर्जाची छाननी करून सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यात आले उमेदवारांना प्रचार करण्यासाठी वेळ देण्यात आला उमेदवारानीं आपल्या पक्षांची निशाणी,नाव निशाणी, अनुक्रमांक असे प्रचारपत्रक छापून प्रिंट केले व प्रचार करत सर्व विध्यार्थी मतदारांना देण्यात आले.

आमचा पॅनल निवडून आल्यास शाळेच्या विकासासाठी आंम्ही कोणकोणता विकास करू शकतो ही भूमिका उमेदवारानीं मांडली.

 मतदान पारदर्शकपणे व शांततामय मार्गाने पार पडण्यासाठी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी महत्वाची भूमिका बजावली.

त्यात मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याध्यापक श्री म्हसकर बी डी, सह निवडणूक अधिकारी म्हणून श्रीमती रणशूर मॅडम, केंद्रप्रमुख म्हणून श्री शिंदे टी जी,पगारे आर व्ही, पवार व्ही के,श्री जाधव डी जी,शेंडे यू बी बर्वे व्ही आर,निकम एस डी व मतदान अधिकारी व निवडणूक मतमोजणी अधिकारी म्हणून किरकाडे के पी, श्रीम गोतरने एन जे,गांगुर्डे पी एस,कदम एस एन,शिंदे डी पी,मोरे ए एस,घुमरे आर एस गावित जी सी,कुंदे एन डी,कटारे एम पी संगमनेरे एस आर,खापरे एस एल,शिंदे एस पी,शिंदे एस बी,हळदे एस बी,शिंदे टी एस यांनी काम पाहिले.

मतदान प्रभाविपणे होण्यासाठी मतदार याद्या तयार करण्यात आल्या.मतदारांच्या बोटाला शाही लावण्यात आली मतदान करण्यासाठी मतदाराला शालेय ओळखपत्र किंवा आधारकार्ड वापरण्यात आले मतदारांना मतपत्रिका पुरविण्यात आली.

मतदान कक्षात १२ पदांसाठी आदर्श मतपत्रिका त्यात उमेदवाराचे नाव,निशाणी,अनु क्रमांक नोंदविले. सुरक्षा रक्षकाची भूमिका शाळेतील स्काउट गाईड पथकाणे बजावली.

या मतदान साठी मतदान निरीक्षक म्हणून म वि प्र सेवक सोसायटी संचालक जाधव डी जी यांनी पाहिले मतदान पुर्ण झाल्यानंतर मतदान प्रतिनिधी व मतदान अधिकारी या समक्ष मतपेटी सील करण्यात आली त्याच दिवशी मत मोजणीसाठी १२ टेबल लावण्यात आले सर्व विध्यार्थी,उमेदवार प्रतिनिधी यांच्या सह्या घेऊन मतपेटी खोलण्यात आली.

१००च्या लॉट प्रमाणे १२फेऱ्या पूर्ण करून मतमोजणी केली माईक च्या साहाय्याने प्रत्येक फेरीचा निकाल कोणत्या उमेदवाराला किती मते पडली,कोणता उमेदवार आघाडीवर आहे हे यांचे काम निडणूक निर्णय अधिकारी जाधव डी जी व आहेर एस आर यांनी जबाबदारी पार पाडली. निवडून आलेले पदनिहाय उमेदवार उमेदवाराचे नाव पद

1)पंतप्रधान — प्रणव दिपक शिंदे 

2)उपपंतप्रधान– कल्याणी नितीन कुशारे 

3)क्रीडा व शिस्त मंत्री — सिद्धार्थ खंडेराव कुशारे 

4)अभ्यास मंत्री — ईश्वरी पांडुरंग जाधव 5) उपअभ्यास मंत्री…. श्लोक विलास कुंभार्डे 

6)आरोग्य मंत्री — तन्वी बाळासाहेब शिरसाट 

7)सहल मंत्री – आदेश नितीन वाघ 

8)सांस्कृतिक मंत्री – सृष्टी रामदास पानगव्हाणे 

9)अर्थ मंत्री – अक्षदा दिलीप खापरे 

10)परिपाठ मंत्री – आराध्या गणेश शिंदे 

11)हरित सेना मंत्री — अनन्या मोहन डोमसे 

12)वाचनालय मंत्री – देवांश दिनेश जेऊघाले

13)शालेय पोषण — कावेरी आप्पा पगार 

14) विज्ञान तंत्रज्ञान मंत्री– ईश्वरी सतीश पाटील 15) आदरातिथ्य मंत्री… सानवी प्रदीप बोराडे 

  या सर्व उमेदवारांचे संस्थेचे सरचिटणीस श्री नितिन ठाकरे,सभापती श्री बाळासाहेब आप्पा क्षीरसागर,उपाध्यक्ष श्री विश्वासरावजी मोरे, उपसभापती श्री.डी.बी.मोगल निफाड तालुका संचालक श्री शिवाजी गडाख,महिला संचालक शोभा भागवत बोरस्ते,संस्था पदाधिकारी व संचालक तसेच पालकांनी अभिनंदन केले.

संपूर्ण मतदान प्रक्रियेचे छायाचित्रण श्री जाधव एस बी व काळे एम पी यांनी केले.

4/5 - (2 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे