Breaking
आरोग्य व शिक्षण

जगदंबा एज्युकेशन सोसायटी व मातोश्री एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येवला येथे भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

न्यायभुमी न्यूज संस्थापक पाटील मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 8 5

न्यायभूमी 

 येवला २८ जानेवारी २०२६ पुष्पा पाटील

जगदंबा व मातोश्री एज्युकेशन सोसायटी संचलित या संस्थेत असणाऱ्या सर्व शाळा व कॉलेज यांचा एस.एन.डी.कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

 भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेतील विविध शाळा व महाविद्यालयांनी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

राष्ट्रगीताच्या गजरात संपूर्ण परिसर देशभक्तीमय वातावरणाने भारावून गेला.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार नरेंद्र भाऊ दराडे हे होते.तसेच संस्थेचे संचालक मा.रुपेश भाऊ दराडे,प्रमुख पाहुणे म्हणून येवला शहरातील नगरसेवक तसेच प्रतिष्ठित मान्यवर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

त्यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रनिर्मितीत घ्यावयाची जबाबदारी यावर प्रकाश टाकला.

 यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत भाषणे, तसेच लघुनाट्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.

भारतीय स्वातंत्र्यलढा,संविधान निर्मिती आणि थोर राष्ट्रपुरुषांचे विचार या विषयांवर आधारित सादरीकरण विशेष आकर्षण ठरले.

 सदर वेळी संस्थेतील सर्वच शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची एस.एन.डी. कॉलेज येवला येथून रॅली ची सुरुवात झाली. त्यामध्ये विशेषता एस.एन.डी.इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून रॅली ची सुरुवात करण्यात आली तिथून रॅली नाशिक रोड येथून विंचूर चौफुली वरून शहराकडे गेली विंचूर चौफुलीवर प्रामुख्याने एस.एन.डी.इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी लाठीकाठी वर आधारित थरारक कला सादर केली त्याचप्रमाणे इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्यद्वारे विविध कलाकृती सादर केल्या त्या ठिकाणी प्रेक्षकांची साथ मिळवत ते एक प्रमुख आकर्षण ठरले.

  त्यानंतर रॅली खांबेकर खुंट या मार्गे गंगा दरवाजाकडे निघाली त्यावेळी छत्रपती संभाजी नगर चौफुलीवर इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी डंबेल्स वर आधारित कवायत संचलन केले यावेळी प्रेक्षकांनी त्यांना भरभरून दाद दिली.

तसेच ती रॅली पुढे गंगा दरवाजा वरून काळा मारुती मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आले त्या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम,लाठीकाठी तसेच डंबेल्सवर आधारित थरारक प्रसंग सादर केला त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी त्या ठिकाणचे संपूर्ण वातावरण उत्साहाचे निर्माण झाले. 

 यानंतर रॅली आझाद चौक वरून जुनी नगरपालिका मार्गे शनि पटांगण येथे आली त्या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर लेझीम,लाठीकाठी व डंबेल्सवर लयबद्ध,तालबद्ध अशा नृत्याने त्या ठिकाणी असलेल्या देशप्रेमींचे मन जिंकले त्या ठिकाणी जमलेल्या गर्दीने टाळ्यांच्या रूपाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले व त्यांच्यावर स्मुर्तीसुमने उधळली. 

रॅलीच्या शेवटच्या टप्प्यात येवला बस स्थानक येथे विद्यार्थ्यांनी देशाविषयी प्रेम,निष्ठा,एकता याचे एकत्रित दर्शन घडवून आणले व देशभक्ती आपल्या राष्ट्राविषयी गर्जना व शिवगर्जना करत बस स्थानक परिसर दुमदुमून उठला.

 सदर कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार श्री.नरेंद्र भाऊ दराडे शिक्षक आमदार मा.श्री.किशोर भाऊ दराडे,मा.श्री.रामदास भाऊ दराडे मा.श्री.लक्ष्मण भाऊ दराडे संस्थेचे संचालक श्री.कुणाल दराडे श्री.रुपेश दराडे येवला शहराचे नगरसेवक तसेच प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. 

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी सर्व शाळा,कॉलेजचे प्राचार्य ,मुख्याध्यापक ,विभागप्रमुख सर्व विद्यार्थी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले व या सर्वांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन केले त्यामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

 कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी देशाची एकता, अखंडता व सार्वभौमत्वाची जपणूक करण्याची शपथ घेतली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम,शिस्त व संविधानाबद्दल आदर निर्माण झाला.

 

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे