पालखेडचे सिंचनाचे दुसरे आवर्तन ७ मार्च पासून सुटणार
पालखेड डावा कालव्याला सिंचनाचे आवर्तन सोडण्याच्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचना
न्यायभूमी न्यूज
लासलगाव दि ०५ बाबा गिते
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सुचनेनुसार दि. ७ मार्च पासून पालखेड डावा कालव्याचे सिंचनाचे दुसरे आवर्तन सोडण्यात येणार असल्याने पालखेड डावा कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पालखेड डावा कालवा लाभक्षेत्रातील सिंचनासाठी दुसरे आवर्तन दि.१५ मार्च २०२५ पासून सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र पालखेड लाभ क्षेत्रात पाणी टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे पिके जळायला सुरुवात झाली आहे.
त्यामुळे लवकर आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सिंचनाचे दुसरे आवर्तन सोडण्याच्या सूचना केल्या आहे.
त्यानुसार ७ मार्च पासून पालखेडचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पालखेड डावा कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे…!