Breaking
कृषीवार्ता

बाजार समितीमुळे शेतकऱ्यांच्या पैशास सुरक्षिततेची हमी

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 8 8

न्यायभूमी न्यूज

लासलगांव दि १५ फेब्रुवारी सुनील पोळ 

शेतीमाल विक्री करणाऱ्या शेतकरी बांधवांनी पैशांच्या सुरक्षिततेसाठी बाजार समितीच्या अधिकृत बाजार आवारांवरच आपला शेतीमाल विक्रीस आणावा असे आवाहन लासलगांव बाजार समितीचे सदस्य छबुराव जाधव यांनी नैताळे व मानोरी खुर्द येथील द्राक्षेमणी लिलाव शुभारंभाच्या वेळी सांगितले.

 

निफाड तालुक्यात द्राक्षे काढणी हंगाम सुरू झाला असुन द्राक्षांच्या पॅकींगनंतर उरणाऱ्या द्राक्षेमण्यांना योग्य बाजारभाव मिळणेसाठी बाजार समितीने कार्यक्षेत्रात उगांव, खानगांव नजिक, नैताळे व मानोरी खुर्द इ. ठिकाणी खरेदी-विक्री केंद्र सुरू केले आहे.

 

प्रारंभी जाधव यांचेसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते द्राक्षेमणी क्रेटस्‌चे विधीवत पुजन करण्यात आले. नैताळे येथे मुहूर्तावर समाधान जाधव यांचा द्राक्षेमणी रू. 32/- प्रति किलो या दराने विक्री झाला. सायंकाळपर्यंत 116 द्राक्षेमणी क्रेटस्‌ची आवक होऊन बाजारभाव कमीत कमी रू. 6/-,जास्तीत जास्त रू. 32/-, सरासरी रू. 22/- प्रति किलो याप्रमाणे होते.

तसेच मानोरी खुर्द (फाटा) येथे मुहूर्तावर राधाकिसन आवारे यांचा द्राक्षेमणी रू. 51/- प्रति किलो या दराने विक्री झाला. सायंकाळपर्यंत 105 द्राक्षेमणी क्रेटस्‌ची आवक होऊन बाजारभाव कमीत कमी रू. 04/-, जास्तीत जास्त रू. 61/-, सरासरी रू. 21/- प्रति किलो याप्रमाणे होते.

 

लिलाव शुभारंभ प्रसंगी जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, नैताळे व मानोरी खुर्द (फाटा) परीसरातील द्राक्षे उत्पादकांच्या मागणीनुसार बाजार समितीने दि. 28 मार्च, 2005 पासुन नैताळे व दि. 03 फेब्रुवारी, 2024 पासुन मानोरी खुर्द (फाटा) येथे द्राक्षे हंगामात द्राक्षेमणी लिलावास सुरूवात केली आहे. गेल्या 19 ते 20 वर्षात या केंद्रांस शेतकरी, अडते, व्यापारी व कामगारांकडुन उत्तम प्रतिसाद मिळाला असुन बाजार समितीच्या सदर उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या पैशास सुरक्षिततेची हमी मिळाली आहे. बाजार समितीने सदरचे खरेदी-विक्री केंद्र सुरू करण्यापुर्वी द्राक्षेमणी खरेदीदार थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शिवार खरेदीद्वारे द्राक्षेमण्यांची खरेदी करीत असे. स्पर्धा नसल्यामुळे बाजारभावात लुट तसेच पैशांची हमी नसल्यामुळे शेतकरी बांधवांना आर्थिक फटका बसत असे.

त्यामुळे बाजार समितीने शेतकरी हित विचारात घेऊन दरवर्षी द्राक्षे हंगामात उगांव, खानगांव नजिक, नैताळे व मानोरी खुर्द येथे द्राक्षेमणी लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नैताळे येथे दरवर्षी द्राक्षेमण्यांच्या खरेदी-विक्रीतुन एक ते दीड कोटी रूपयांची उलाढाल होते. नैताळे केंद्रावर सन 2005 ते 2024 पर्यंत 11 लाख क्रेटस् द्राक्षेमण्यांची आवक होऊन सुमारे 20 कोटी रूपयांची उलाढाल याठिकाणी झाली आहे. तर मानोरी खुर्द (फाटा) केंद्रावर मागील वर्षी दीड लाख क्रेटस् द्राक्षेमण्यांची आवक होऊन सुमारे 12 लाख रूपयांची उलाढाल झाली आहे.

द्राक्षेमणी खरेदीसाठी अनेक व्यापारी उपस्थित असल्याने उघड व स्पर्धात्मक लिलावाद्वारे द्राक्षेमण्यांना जास्तीत जास्त बाजारभाव मिळतात. त्यामुळे द्राक्षे उत्पादक बांधावर द्राक्षेमणी विक्री न करता सदर खरेदी-विक्री केंद्रावर द्राक्षेमणी विक्रीस प्राधान्य देतात.

 

           यावेळी बाजार समितीचे सदस्य भिमराज काळे, राजेंद्र बोरगुडे, सदस्य सचिव नरेंद्र वाढवणे, मानोरी खुर्द सोसायटीचे चेअरमन सोपान संभेराव, ग्रामपंचायतीचे सदस्य संदीप संभेराव, गोरक्षनाथ संभेराव, रामदास वावधाने, आत्माराम संभेराव, दशरथ वावधाने, अक्षय वावधाने, बाजीराव वावधाने, सचिन वावधाने, प्रमोद संभेराव, योगेश संभेराव, विनायक शिंदे, जयंत लोहारकर, अशोक खताळे, दत्तात्रय भवर, आण्णासाहेब बोरगुडे, सहसचिव प्रकाश कुमावत, लेखापाल पांडुरंग खैरे, सर्व लिलाव प्रमुख काकासाहेब जगताप, पंकज होळकर, द्राक्षेमणी खरेदीदार बापु धरम, विष्णुपंत गायकर, शेखर इप्पर, इम्रान शेख, जाकीर शेख, पप्पु मोमीन, हैदर पठाण, शकील शेख, समीर शेख, सद्दाम शेख, भुसार व तेलबिया व्यापारी दिपक साबळे, दिगंबर गुंजाळ, सुभाष शिंदे, दिनेश लोहारकर, नामदेव वाळुंज, निखील घाडगे, किरण चव्हाण, विजय शेळके, सुरेश मोरे, ईश्वर शिंदे, शांताराम उल्हाळे, योगेश जाधव, कृष्णा कहांडळ, वसंत वावधाने, सचिन पोमनर, यादव शेळके, मानोरी खुर्द (फाटा) खरेदी-विक्री केंद्राचे प्रभारी संदीप निकम, सहाय्यक रामदास गायकवाड, गणेश आहेर, वैभव शेळके, नैताळे खरेदी-विक्री केंद्राचे प्रभारी वाल्मिक खालकर, तेजस पुंड, रवि जाधव, मुकूंद शिंदे, प्रतिक घायाळ, महेंद्र शेलार यांचेसह परीसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

 

मानोरी खुर्द (फाटा) येथे सुरू करावे बाजार समितीने कांदा लिलाव.

 

सदर प्रसंगी मानोरी खुर्द वि. का. सोसायटीचे चेअरमन व सदस्य तसेच भरवस (मानोरी खुर्द) ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य आणि मानोरी खुर्द व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बाजार समितीच्या मानोरी खुर्द (फाटा) येथील खरेदी-विक्री केंद्रावर लवकरात लवकर कांदा लिलाव सुरू करावे.

या आशयाचे निवेदन बाजार समितीचे सदस्य भिमराज काळे व सदस्य सचिव नरेंद्र वाढवणे यांचेकडे दिले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे