Breaking
आरोग्य व शिक्षण

कर्मवीर डी आर भोसले यांना विनम्र अभिवादन

न्यायभूमी न्यूज सहसंपादक सुनील पोळ

1 2 0 4 3 4

वडाळीभोई दि.१३ सप्टेंबर 

मविप्र समाज संस्था नाशिक संचलित जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि अभिनव बाल विकास मंदिर वडाळीभोई येथे आज शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी संस्थेचे आद्य संस्थापक म्हणून ओळखले जाणारे कर्मवीर डी आर भोसले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री हिम्मत भदाणे व श्री सूर्यभान वडक्ते यांनी कर्मवीर भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण केली तर उपस्थित सर्वांनीच प्रतिमेचे पूजन केले.

शालेय विद्यार्थिनी कु अक्षदा खैरनार तिने आपल्या मनोगतातून कर्मवीर डी आर भोसले यांचा जीवन परिचय तसेच कार्य याविषयी माहिती सांगितली तर शिक्षक मनोगतातून श्री घनश्याम झुटे यांनी देखील कर्मवीर डी आर भोसले यांचे शिक्षण,सहकार आणि सामाजिक कार्य तसेच पारतंत्र्याच्या काळात देखील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी घेतलेले कष्ट यांचा आढावा घेतला.

यावेळी अभिनव बाल विकास मंदिर, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 2 0 4 3 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे