Breaking
महाराष्ट्र

निफाडमध्ये वीजपुरवठ्याचा लपंडाव; युवासेनेचा महावितरणला टाळे ठोकण्याचा इशारा!

वारंवार अघोषित वीज खंडित; दिवाळीपूर्वी वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

1 3 2 3 8 6

न्यायभूमी

निफाड दिनांक ३० ऑक्टोंबर 

निफाड परिसरात वारंवार आणि कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. दिवसा असो वा रात्री, अचानक वीज गायब होत असल्यामुळे नागरिक, विद्यार्थी, व्यापारी आणि शेतकरी वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर युवासेना जिल्हाप्रमुख (नाशिक ग्रामीण) विक्रम नामदेव रंधवे यांनी महावितरण प्रशासनाला लेखी निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

 

पाणीपुरवठा, शिक्षण आणि व्यापारावर परिणाम!

 

वीजपुरवठा खंडित झाल्याने नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनांवर परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होत असून व्यापारी व लघुउद्योजकांचे दैनंदिन कामकाज विस्कळीत होत आहे.

रात्रीच्या वेळी वीज गायब झाल्याने रस्ते व वस्त्यांमध्ये अंधार पसरून सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होत आहे.

 

दिवाळी सण जवळ आल्याने घरातील साफसफाई आणि सणाच्या तयारीची कामे सुरू आहेत. अशा वेळी वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे.

 

दोन तासांपेक्षा अधिक वीज बंद नको!

 

महावितरणने तातडीने देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेऊन संबंधित लाईनमन व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना द्याव्यात. निफाड परिसरातील वीजपुरवठा सुरळीत, अखंडित व वेळेवर उपलब्ध करून द्यावा. कोणत्याही कारणास्तव दोन तासांपेक्षा अधिक काळ वीजपुरवठा खंडित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

 

अन्यथा महावितरण कार्यालयाला टाळे!

 

नागरिकांच्या वाढत्या संतापाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येवर तातडीने तोडगा न काढल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करून महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा विक्रम नामदेव रंधवे यांनी दिला आहे.

नागरिकांची दिवाळी अंधारात जाऊ नये, यासाठी महावितरण प्रशासनाने आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष कृती करावी, अशी मागणी होत आहे.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 3 2 3 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे