Breaking
महाराष्ट्र

भरवस येथे भागवत कथेच्या कार्यक्रमाचा ध्वजारोहण व पूजन संपन्न..

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील मुख्य संपादक दत्तात्रय,संपादक उत्तम गारे

0 9 2 0 9 7

न्यायभूमी न्यूज

नासिक ( विंचूर)दि.३ एप्रिल सुनील क्षीरसागर 

भरवस ता.निफाड येथील “द्वारकाधिश सेवा संस्था ट्रस्ट, श्री कृष्ण मंदिर” चे संचालक,सर्वेसर्वा पूजनीय प.पू.प.महंत श्री मयंकराज बाबा पंजाबी (अध्यक्ष महानुभाव परिषद,नाशिक) यांनी सुप्रसिद्ध आदरणीय प.पू.प.महंत श्री चिरडे बाबा यांच्या सुमधुर वाणीमधून “संगीतमय भागवत कथा” या कार्यक्रमाचे दि.०७ एप्रिल २०२५ ते दि.१३ एप्रिल २०२५ असे एकूण.७ (सात) दिवस सायंकाळी ०७:०० ते रात्री १०:०० या वेळेत “संगीतमय भागवत कथा” कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.

    “साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त” असलेल्या “गुडीपाडवा” या नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर “ध्वजपूजन आणि ध्वज उभारणे” हा उदघाटन कार्यक्रम आयोजित केलेला होता.

त्यानिमित्त या कार्यक्रमाची रुपरेषा आणि सूत्रसंचालन समाधान पाटील (ग्रामपंचायत अधिकारी) ग्रुप ग्रा.पं.भरवस (मानोरी खु)यांनी केले.

या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती लासलगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे,आदरणीय प.पू.प.महंत श्री प्रेममुनी बाबा,श्री चेतन बाबा,लोकनेते सहकारी बँक लासलगाव चे सर्वेसर्वा आदरणीय नानासाहेब पाटील,भरवस गावचे पो.पाटील विलास चौधरी,ग्रा.पं.उपसरपंच संपत जाधव, ग्रा.पं.सदस्य धर्मराज जाधव,पांडुरंग जाधव, पाचोरे गावचे भूमिपुत्र आदरणीय तानाजीराव आंधळे,विजय वावधाने,किशोर गीते, बंडू पठाडे,पवार तसेच आजूबाजूच्या गावातून या कार्यक्रमासाठी हजर असलेले उपदेशी,अनुयायी व इतर जेष्ठ-श्रेष्ठ मंडळी आदी उपस्थित होते.

या द्वारकाधीश सेवा संस्था ट्रस्ट श्रीकृष्ण मंदिर भरवस यांनी असे सांगितले की,या कार्यक्रमासाठी भाविक भक्तांनी- श्रोत्यांनी मोठ्या संख्येने भागवत कथा श्रवणाचा व महाप्रसादाचा दररोज लाभ घ्यावा.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 2 0 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे