Breaking
महाराष्ट्र

अण्णासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अंतर्गत लासलगाव–पिंपळगाव नजीक भव्य स्वच्छता मोहीम संपन्न

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 9 4

न्यायभूमी 

 लासलगाव दि.०१ मार्च

लासलगाव व पिंपळगाव नजीक परिसरात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने उत्साहात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

“स्वच्छता हीच सेवा” या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात १०३ श्री सदस्य आणि लासलगाव ग्रामपंचायतचे ३६ कर्मचारी यांनी सहभाग नोंदवून श्रमदान केले.

यावेळी पिंपळगाव नजीक व लासलगाव येथील स्मशानभूमी व लासलगाव ग्रामीण रुग्णालय आदी परिसराची स्वच्छता करून आरोग्य व सामाजिक जबाबदारीचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.या उपक्रमातून सुमारे ६७०० किलो सुका कचरा व २०० किलो ओला कचरा गोळा करण्यात आला.

 

यावेळी लासलगाव ग्रामपंचायत सरपंच सौ. योगिता पाटील,पिंपळगाव नजीक ग्रामपंचायतीचे सरपंच ॲड तुकाराम जाधव, सदस्य ॲड सुभाष देशमुख, लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील पाटील आणि ग्रामपंचायत अधिकारी संजय बाविस्कर यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

सरपंच तुकाराम राजाराम जाधव म्हणाले, “प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविण्यात आलेली ही स्वच्छता मोहीम गावासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.

स्मशानभूमी आणि रुग्णालय परिसरासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांची स्वच्छता करून आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला आहे.

भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा आमचा मानस आहे.”

सरपंच सौ. योगिता योगेश पाटील यांनी सांगितले, “शेकडो श्री सदस्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केलेले श्रमदान कौतुकास्पद आहे.

या मोहिमेमुळे ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढली असून गाव अधिक सुंदर व निरोगी बनण्यास मदत झाली आहे.”

ग्रामपंचायत अधिकारी संजय बाविस्कर म्हणाले, “केवळ कचरा संकलन नव्हे तर ओला व सुका कचरा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून आदर्श व्यवस्थापन करण्यात आले.

ग्रामपंचायत आणि प्रतिष्ठान यांचे समन्वयातून झालेले हे कार्य इतर गावांसाठीही आदर्श ठरेल.”

“स्वच्छ भारत, सुंदर भारत” या संकल्पनेला साकार करत या उपक्रमामुळे परिसरात सकारात्मक बदल घडून आला असून ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत नवी जाणीव निर्माण झाली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे