‘सावित्री तू होतीस म्हणून’या विषयावर डॉ.प्रतिभा जाधव यांचे व्याख्यान संपन्न
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी न्यूज महाराष्ट्र
लासलगाव दि.१८ जानेवारी / सहसंपादक सुनील पोळ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,लासलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ.यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाले अंतर्गत ‘सावित्री तू होतीस म्हणून’या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रतिभा जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आपल्या व्याख्यानात डॉ.जाधव यांनी सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाचा मार्ग कसा खुला केला,समाजातील अडथळ्यांना न घाबरता त्यांनी केलेला संघर्ष आणि त्याचा आजच्या स्त्रीशिक्षणावर झालेला सकारात्मक परिणाम यावर सविस्तर प्रकाश टाकला.
सावित्रीबाईंच्या कार्यामुळेच आज महिलांना शिक्षण, स्वातंत्र्य व समानतेच्या संधी उपलब्ध झाल्या असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सोमनाथ आरोटे होते.त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात “विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात सावित्रीबाई फुले यांचे विचार आचरणात आणले तर निश्चितच जीवनात उज्ज्वल भवितव्य घडू शकते,” असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ.राजेश शंभरकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संदीप ठाकरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी आदरणीय गोविंदरावजी होळकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.



