वर्कर्स फेडरेशनची महावितरण प्रशासनाकडे मागणी
महावितरणच्या ३२९ उपकेंद्रामध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करून नवीन कामगार भरती भरू नये
न्यायभूमी न्युज
नासिक दि २३ ऑगस्ट
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेची ३२९ उपकेंद्रे खाजगी एजन्सींना कंत्राटी पद्धतीने चालविण्यात देण्यास संघटनेचा धोरणात्मक विरोध आहे.
संघटनेच्या धोरणात्मक विरोधाला न जुमानता प्रशासनाने २ खाजगी ठेकेदारांना ३२९ उपकेंद्रे कंत्राटी पद्धतीने (संचालन व देखभाल दुरुस्ती) करण्याकरीता ३ वर्षाकरिता चालविण्यात दिलेली आहे.
ज्या दोन एजन्सीना उपकेंद्रे चालविण्याचे कॉन्टॅक्ट दिलेले आहे. त्या एजन्सीने जुन्या कामगारांना काढून नवीन कामगार भरती करणे,जे कामगार भरल्या जातील त्यांच्याकडून राजीनामा लिहून घेणे,एजन्सीच्या युनियनचे सभासद होणे असे अनेक बंधने टाकलेली आहे.
मा.देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांनी यापूर्वी त्यांच्या समवेत कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर चर्चा झाली,तेंव्हा कंत्राटी कामगार पुरवणारी एजन्सी बदलली तरी कंत्राटी कामगार बदलला जाणार नाही असे आश्वासन दिले होते.त्या आश्वासनाचे उल्लंघन उपकेंद्रामध्ये यंत्रचालक पुरवठा करणाऱ्यां एजन्सी करत आहे.
एजन्सी करत असलेल्या बाबी कॉम्रेड मोहन शर्माजी अध्यक्ष,कॉम्रेड एस.आर.खतीब उपाध्यक्ष व कॉम्रेड कृष्णा भोयर सरचिटणीस यांनी दि.२२.०८.२०२५ रोजी मा.सचिन तालेवार (संचालक संचालन व प्रकल्प),मा.राजेंद्र पवार संचालक (मानव संसाधन),मा.धनंजय औंढेकर कार्यकारी संचालक (वितरण) व मा.संजय ढोके मुख्यऔद्योगिक संबंध अधिकारी याची भेट घेऊन विस्तृत चर्चा करून निदर्शनास आणून दिली.
मा.सचिन तालेवार साहेब यांनी सोमवार दि.२५.०९.२०२५ रोजी संबंधित २ एजन्सी बरोबर मुख्य कार्यालयात बैठक बोलावली असून त्याबाबत संबंधित एजन्सीला सूचना देण्यात येतील असे स्पष्ट केले.



