नाशिक – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भरवस फाट्यादरम्यान भीषण अपघात
अवजड वाहनाच्या धडकेत ३० वर्षीय महिला जागीच ठार

न्यायभूमी
नासिक दि.११ मार्च बाबा गीते
नाशिक – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील भरवस फाट्याजवळील जीवो पेट्रोल पंपासमोर दुचाकीला पाठीमागून अवजड वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील ३० वर्षीय महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
बुधवार दि.११ मार्च रोजी दुपारी १.३८ वाजेच्या सुमारास किरण अंबादास चौधरी व सोनाली किरण चौधरी हे भरवस फाटा परिसरात (एम एच १५, १८२६ पॅशन प्रो) दुचाकी वरून विंचूरकडे जात असतांना पाठीमागून येणाऱ्या अवजड वाहनाने (एम.एच.१५,एच.एच ९९३२) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
त्यात सोनाली चौधरी वय ३० या उडून लांब पडल्याने त्यांचा मेंदूला मार लागून जागीच मृत्यू झाला. पती किरण चौधरी हे गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच लासलगावचे सहा.पोलिस निरीक्षक दिपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करीत संताप व्यक्त केल्याने
काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू असून, दोषी वाहनचालकावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
या मार्गावरच दोन दिवसांपूर्वी जळगाव नेऊर ता.येवला येथील तुषार विलास घुले (वय २८) व आकाश बाळुबा सोनवणे (वय २६) हे दोन जीवलग मित्र आपल्या दुचाकी एम.एच १७ आर.५३१८ वर विंचूर वरून जळगाव नेऊरला जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला होता.
त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा झाला आहे.



