योगिराज तुकाराम बाबा गुरुकुलात गीताजयंती उत्साहात साजरी
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
कोळगाव दि.०२ डिसेंबर अजिंक्य जगताप
खेडलेझुंगे येथील योगिराज तुकाराम बाबा गुरुकुलात भगवद गीता जयंती उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमास द्वारकानाथभाऊ गुजर, सोमनाथ भाऊ घोटेकर, भाऊसाहेब भाऊ आणि लक्ष्मणभाऊ गिते उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भगवद्गीता ग्रंथपूजनाने झाली.यावेळी श्रीकृष्णाची प्रतिमा तसेच योगिराज तुकाराम बाबांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अध्यात्मिक मूल्यांची ओळख करून दिली.
यानंतर द्वारकानाथभाऊ व सोमनाथभाऊ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गीतेमधील कर्मयोग,शिस्त,सत्यनिष्ठा आणि योग्य आचरणाचे महत्त्व स्पष्ट केले.
गीतेमध्ये सांगितलेले कर्मयोग,ज्ञानयोग व भक्तीयोग याविषयी माहिती व गीता कशी निर्माण झाली व आपल्यापर्यंत कशी आली,याची माहिती रविंद्र गोरडे सरांनी विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी गीतेचा पंधरावा अध्याय विद्यार्थ्यांकडून म्हणून घेण्यात आला.
तसेच‘गीता- सार’विद्यार्थ्यांकडून वाचून घेण्यात आले.



