Breaking
महाराष्ट्र

विंचूर येथे नऊ माकडांचे आगमन – ग्रामस्थांमध्ये उत्सुकता व बालगोपालांमध्ये आनंदाचे वातावरण

न्यायभूमी न्यूज

0 9 0 0 0 1

न्यायभूमी दि.१३ सप्टेंबर विंचूर (नाशिक) सुनील क्षीरसागर

विंचूर (ता.निफाड) येथे आज सकाळपासून नऊ माकडांचा अचानक वावर सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली. गावाच्या मारवाडी पेठात, शेतशिवार परिसरात तसेच मंदिराजवळ ही माकडांची तुकडी दिसून आली.

ग्रामस्थांनी या वानरांचे प्रेमाने स्वागत केले. विशेषत: युवकांनी त्यांना केळी,भाकरी,फळे व पाणी देऊन संतृष्ट केले.त्यामुळे माकडांचा हा थवा गावात निर्धोक फिरताना दिसला.

बालगोपालांसाठी ही घटना विशेष आकर्षण ठरली. मुलांनी माकडांच्या उड्या-उड्या व खोडकर हालचाली पाहून आनंदाने टाळ्या वाजवल्या. ग्रामस्थांनीदेखील या दृश्याचा मनसोक्त आनंद घेतला.

  गावातील वयोवृद्ध नागरिक म्हणाले की, “वानरांचे आगमन हे शुभ मानले जाते.अशा वेळी गावात आनंदाचे वातावरण निर्माण होते.”

   एकंदरीत विंचूरमध्ये या नऊ माकडांच्या आगमनामुळे ग्रामस्थांमध्ये उत्सुकता,भक्तिभाव व बालगोपालांमध्ये हर्षोल्हासाचे वातावरण दिसून आले..

5/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे