Breaking
महाराष्ट्र

रन फॉर युनिटी’ एकता दौडमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी लासलगाव पोलीस स्टेशनतर्फे नागरिकांना आवाहन

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 8 8

न्यायभूमी 

लासलगाव दि.३० ऑक्टोंबर बाबा गीते 

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त लासलगाव पोलीस स्टेशनच्या वतीने दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजता ‘रन फॉर युनिटी (एकता दौड)’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

देशातील एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या या उपक्रमाचे आयोजन

दत्तात्रय कराळे (विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र),बाळासाहेब पाटील (पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण),आदित्य मिरखेलकर (अपर पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण), आणि के.के.पाटील (उपविभागीय पोलीस अधिकारी,निफाड) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे.

राष्ट्रीय एकता वृद्धिंगत करण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा,असे विनम्र आवाहन लासलगाव पोलीस स्टेशन तर्फे करण्यात आले आहे.

या ‘एकता दौड’ची सुरुवात लासलगाव पोलीस स्टेशन येथून दिनांक ३१ ऑक्टोंबर २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजता करण्यात येणार असून, समारोप स्वामी रिसॉर्ट,विंचूर रोड येथे केला जाणार आहे.

तरी लासलगाव शहर तसेच ग्रामीण भागातील सर्व महिला-पुरुष नागरिक,शिक्षक,पत्रकार बांधव,ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थीवर्ग यांनी या एकता दौडीत सहभागी व्हावे,असे आवाहन लासलगाव पोलीस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे