न्यायभूमी न्यूज
विंचूर दि १९ फेब्रुवारी मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
विंचूर येथील भवानी पेठ मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुताळ्याला सकाळी जोडप्यांसह अभिषेक व पुष्पहार अर्पण करुण शिवजयंती उत्साहाला सुरुवात करण्यात आली.
शिवजयंती उत्सानिमित्त विंचूर येथील शिवभक्ताकडून रात्री आदल्या दिवशी बारा वाजता मोठ्या प्रमाणात आताषबाजी करण्यात आली.
तसेच गावातील लहान विद्यार्थी मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले.त्यानंतर संध्याकाळी संपूर्ण शहरांमधून भव्यदिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीने अवघ्या गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळेस विंचूर लासलगाव पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे व गावातील सर्व शिवभक्त, राजकीय नेते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
विंचूर येथील भवानी पेठ मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचे काम प्रगतीपथावर असून शिव भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
विंचूर येथे लहानग्या शिवभक्तांकडून शिवजयंती साजरी
विंचूर – विंचूर येथील ब्राह्मण गल्ली येथे लहानग्या चिमुकल्यांनी एकत्र येत पहिल्यांदाच शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.
शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवून पाठीमागे डेकोरेशन करण्यात आले व ढोल वाजून शिवजयंती चिमुकल्या शिवभक्तांनी मोठ्या उत्साहात साजरी केली.
यावेळी परिसरातील मोठ्या नागरिकांनी लहान मुलांचे कौतुक केले.मुलांना शिवाजी महाराजांच्या जीवनातील मूल्ये कळावी असे प्रतिपादन येथील पालकांनी केले.
यावेळी ओम सोनवणे,सात्विक जोशी, साई सोनवणे,ओम वाघचौरे,साई वाघचौरे, मानव वाघचौरे,रीयाशी जोशी,आयुश जोशी, श्री भावसार, अवदुथ जोशी या लहान शिवभक्तानी एकत्र येऊन ही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.



