Breaking
नोकरी

सेवक लोंढे यांच्या कामाचा इतर सेवकांनी आदर्श घ्यावा-मविप्र संस्था सरचिटणीस ॲड ठाकरे 

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 9 4

न्यायभूमी न्यूज 

    सिन्नर दि ३० जून प्रतिनिधी ( सोमनाथ गिरी) 

संस्था दैवत मानून श्री.लोंढे यांनी अतिशय प्रामाणिकपणे व आदर्शवत काम केले आहे.मध्यवर्ती कार्यालयात काम करण्याची संधी त्यांना मिळाली व त्या संधीचे त्यांनी सोने केले.

शिक्षक शिक्षकेतर सेवक यांचे प्रश्न हाताळण्याचे व सोडविण्याचे अतिशय जिकरीचे काम त्यांनी केले आहे.काम करीत असताना त्यांनी पारदर्शकता व गोपनीयता पाळली.

श्री.लोंढे यांनी अतिशय चांगले काम केले असून त्यांच्या कामाचा इतर सेवकांनी आदर्श घ्यावा असे आव्हान मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे यांनी केले.

          मनेगाव येथील नूतन जवाहर विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक दत्तात्रय लोंढे यांच्या सेवापूर्ती कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

 ॲड ठाकरे पुढे म्हणाले की,संस्थेच्या संख्यात्मक व गुणात्मक विकासात संस्थेच्या कार्यकारी मंडळा बरोबरच संस्थेचे सभासद,हितचिंतक, देणगीदार तसेच सेवकांचेही मोठे योगदान आहे.त्यामुळेच संस्था आज प्रगतीपथावर आहे व यापुढे राहणार आहे.

       श्री.लोंढे हे ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले असून त्यांचा सेवापूर्तीचा सोहळा मातोश्री नर्मदा लॉन्स सिन्नर या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला.

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र समाज संस्थेचे तालुका संचालक कृष्णाजी भगत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुनिल ढिकले,उपाध्यक्ष विश्वासराव मोरे,सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपसभापती देवराम मोगल,चिटणीस दिलीप दळवी,संचालक ॲड संदीप गुळवे,डॉ. सयाजीराव गायकवाड,विजय पगार,रमेश पिंगळे,ॲड रमेशचंद्र बच्छाव,नंदकुमार बनकर,रविंद्र देवरे,प्रविण नाना जाधव,शिवाजी गडाख,ॲड लक्ष्मण लांडगे,अमित बोरसे, डॉ.प्रसाद सोनवणे,शालनताई सोनवणे,शोभा बोरस्ते,माजी संचालक विजय गडाख,हेमंत नाना वाजे,संस्थेचे सेवक संचालक डॉ.संजय शिंदे, सी.डी.शिंदे,संस्थेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ.भास्करराव ढोके,डॉ.कैलास शिंदे,प्रा.शशिकांत मोगल,श्रीमंत पतसंस्थेचे चेअरमन नारायण वाजे,माजी जि.प.सदस्या सीमंतिनी कोकाटे,अशोक सोनवणे,माजी मुख्याध्यापक गुलाब भामरे,अशोक पिंगळे, शालेय समितीचे अध्यक्ष नितीन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

        प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यपिका सिमा हांडगे यांनी केले.सत्कारार्थी लोंढे यांचा परिचय उपशिक्षिका वृषाली खताळ यांनी करून दिला 

        प्रमुख पाहुण्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी उपसभापती मोगल,डॉ. एस.के.शिंदे,कवि माणिकराव गोडसे,सागर गुजर,वैभव लोंढे,विजया लोंढे आदीं आपले मनोगत व्यक्त केले.

       सत्कारमूर्ती दत्तात्रय व सौ.विजया लोंढे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

         सत्काराला उत्तर देतांना श्री.लोंढे म्हणाले की,कर्मवीरांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन सदैव संस्थेसाठी काम केले.आईच्या संस्काराची शिदोरी माझ्या बरोबर होती त्यामुळेच मला काम करणे सोपे गेले.

मला माझ्या सरका-यांनी खुप सहकार्य केले. त्यामुळेच मी चांगले काम करू शकलो.

तसेच जीवनातील विविध कठीण प्रसंग सांगताना श्री.लोंढे यांना गहीवरून आले.

          अध्यक्षीय भाषणात कृष्णाजी भगत म्हणाले की,श्री.लोंढे यांनी शिस्त,गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रीचा वापर करून कामकाज केले.पदाचा अभिमान वाटावा असा ठसा त्यांनी आपल्या कामाचा उमटवला आहे. त्यामुळे ते संस्थाचालक प्रियही सेवक होते.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल खैरनार व वैशाली वाजे यांनी केले तर आभार प्रदर्शन मविप्र संस्था उपाध्यक्ष विश्वास मोरे यांनी केले.

कार्यक्रमास आजी- माजी मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर सेवक,मित्र परिवार,व नातेवाईक उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक,शिक्षकेतर सेवक व मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे