Breaking
महाराष्ट्र

विंचूर व परिसरातील कृषी विक्रेत्यांचा एकदिवसीय लाक्षणिक बंद

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 9 5

न्यायभूमी 

 विंचूर  दि.२९ ऑक्टोबर सुनील क्षिरसागर 

राज्य सरकारने खत,बियाणे व कीटकनाशक विक्रीसाठी सुरू केलेल्या “साथी पोर्टल ॲप” च्या सक्तीच्या अंमलबजावणीविरोधात विंचूरसह मालेगाव,नाशिक,पुणे पूर्ण राज्यातच ॲग्रो डीलर्स असोसिएशनतर्फे एकदिवसीय लाक्षणिक बंद पाळण्यात आला.

या बंददरम्यान सर्व कृषी केंद्रे बंद ठेवून विक्रेत्यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदवला.

कृषी विक्रेत्यांचे म्हणणे आहे की,साथी ॲपद्वारे विक्री करणे अत्यंत जाचक आणि अव्यवहार्य असून, यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक खत, बियाणे व कीटकनाशके वेळेवर मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत.परिणामी शेतीकाम ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

असोसिएशनचे अध्यक्ष,उपाध्यक्ष आणि सचिव यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, साथी ॲप रद्द करून पूर्वीप्रमाणे विक्री करण्यास परवानगी द्यावी.

अन्यथा हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या बंदामध्ये निफाड तालुक्यातील सर्व कृषी विक्रेते सहभागी झाले होते.विक्रेत्यांचे म्हणणे आहे की,हा लाक्षणिक बंद शेतकऱ्यांच्या अडचणी सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी करण्यात आला आहे.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे